GST Invoice Racket : मुंबईत GST रॅकेटचा पर्दाफाश, 41 कोटींच्या बनावट बिलांसह एकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

GST crime

मुंबईत GST रॅकेटचा पर्दाफाश, 41 कोटींच्या बनावट बिलांसह एकाला अटक

GST Invoice Racket : बनावट बिलांच्या आधारे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवण्याचा लाभा घेणाऱ्या एका मोठ्या टोळीचा मुंबईतील CGST भिवंडी आयुक्तालयाच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. 41 कोटींच्या बनावट बिलांच्या आधारे सुरुवातीला 18 कोटींची आयटीसी सापडली असून, याप्रकरणी एका फर्मच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सीजीएसटी भिवंडीचे आयुक्त सुमित कुमार म्हणाले की, ही टोळी बनावट जीएसटी चालानद्वारे इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा घेत होती. या टोळीशी संबंधित एका फर्मने 14.30 कोटी रुपयांच्या बोगस बिलांद्वारे 2.57 कोटी रुपयांच्या आयटीसीचा लाभा घेतला होता. ही बाब समोर येताच कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Gst Invoice Racket Busted In Mumbai Fake Bills Worth 41 Crores Found One Arrested

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..