
Mumbai: ठाणे जिल्ह्याच्या विकासात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे ठाण्याचा पालकमंत्री होण्याचा सर्वाधिकार त्यांचाच असून या शर्यतीतून आपण बाहेर असल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
मंत्रिमंडळात परिवहन विभागाचा पदभार स्वीकारताच प्रताप सरनाईक यांनी रविवारी ठाण्याच्या खोपट येथील एसटी आगाराची पाहणी केली. यावेळी ठाण्याच्या पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. यावेळी परिवहन हे एक जबाबदारीचे खाते असून त्याबाबत आपण समाधानी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.