मेट्रो उद्घाटनावरून रंगणार वाद? फडणवीसांना निमंत्रण नाही

Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis
Uddhav Thackeray vs Devendra Fadnavisesakal
Updated on
Summary

मुंबईमध्ये लोकल ट्रेन ही महानगराची जीवनवाहिनी आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये लोकल ट्रेन (Mumbai Local Train) ही महानगराची जीवनवाहिनी आहे. दुसरीकडं मेट्रो (Mumbai Metro) सेवा शहरी वाहतुकीला नवा आयाम देत आहे. आज 2 एप्रिलला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबई मेट्रोच्या दोन नवीन मार्गांवर वाहतूक सेवा सुरू होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दुसऱ्या मेट्रो रेल्वे मार्गाला हिरवा झेंडा दाखवतील. मात्र, मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कोणतंही निमंत्रण देण्यात आलं नाहीय. या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर भाजपनं बहिष्कार टाकल्याचं कळतंय.

मुंबईतील पहिला मेट्रो रेल्वे मार्ग 8 वर्षांपूर्वी सुरू झाला होता, आता दुसरा रेल्वे मार्ग आजपासून सुरू होणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोच्या कामाबाबत सरकारवर निशाणा साधलाय. पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘मेट्रोची कामे आम्ही सुरू केली होती, ती आता या सरकारच्या कार्यकाळात पूर्ण झाली आहेत. जनतेला सर्व काही माहित आहे.’

Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis
येत्या 10 महिन्यांत गोव्यात काँग्रेसचं सरकार असेल : आमदार मायकल लोबो

फडणवीस पुढं म्हणाले. ‘आम्ही ज्या पद्धतीनं काम केलं, तसेच काम या सरकारनंही केलं, तर कारशेडचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागू शकतो आणि मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाचं रखडलेलं कामही नऊ महिन्यांत सुरू होऊ शकतं, अन्यथा पुढील 4 वर्षे ही मेट्रो सुरू होणार नाहीय, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com