

Gujrat Lions will arrive at Byculla Zoo
ESakal
मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात लवकरच गुजरातच्या सिंहांची गर्जना कानी पडणार आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पत्र लिहून सिंह देण्याची मागणी करणार आहेत, असे पालिका प्रशासनाने सांगितले. मुंबईच्या महापौर रितू तावडे लवकरच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पत्र लिहून राणीच्या बागेसाठी सिंहांची मागणी करणार आहेत.