esakal | गुजरातमध्ये लपलेल्या तिघा चोरट्यांना अटक | thief arrested
sakal

बोलून बातमी शोधा

thief

गुजरातमध्ये लपलेल्या तिघा चोरट्यांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : शहरातील मेडिकल फोडून गुजरातमध्ये (Gujrat) लपून बसलेल्या तिघा आरोपींना विठ्ठलवाडी पोलिसांनी (vitthalwadi police) तेथे जाऊन अटक केली. सुभाष टेकडीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सुधीर चौधरी यांचे गुरुकृपा मेडिकल स्टोअर्स (Medical store) आहे. रिक्षातून आलेल्या चोरांनी (thief) शटरची दोन्ही कुलपे तोडून ९५ हजारांची रक्कम (robbery) पळविली होती.

हेही वाचा: कऱ्हाडात धुळोबा डोंगरावरची वृक्षसंपदा जळून खाक; ठिबक सिंचनासह झाडांचे मोठे नुकसान

पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, वरिष्ठ निरीक्षक कन्हय्या थोरात, निरीक्षक (गुन्हे) धनंजय कापरे, उपनिरीक्षक हर्षल राजपूत यांनी सीसीटीव्हीद्वारे चार आरोपींचे चेहरे टिपले. यातील एक आरोपी सोनू ठाकूर याला लगेच पोलिसांनी ताब्यात घेतले. तीन आरोपी गुजरातमध्ये अमरोली शहरात असल्याची माहिती मिळताच पथक तेथे पोचले. तेथील एका चाळीतील खोलीत राहणाऱ्या विजय सपकाळ, सागर शेजवळ, संदीप रामटेके या तिघांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने चारही आरोपींना ११ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

loading image
go to top