
जळगाव : ‘‘खरे तर संजय राऊत यांना अगोदर दवाखान्यात दाखल केले पाहिजे. संजय राऊत हा माणूसच राहिला नाही. त्यांनी अगोदर ठाकरेंची शिवसेना संपविली, राष्ट्रवादी संपविली, शरद पवारांची राष्ट्रवादी संपविली, उद्धव ठाकरेंना संपविले. आता राहिले सोयरेही संपणार आहे. ते ‘मेंटल’, पागल झाले आहे. त्यांच्या हातात दगड दिले पाहिजेत. त्याला म्हणा हातात दगड घेऊन भिवंडीच्या बाजारात फिर म्हणावे,’’ असा उलटवार शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर रविवारी येथे केला.