
सदावर्तेंची पुन्हा झाली चौकशी; गावदेवी पोलिसांनी पाठवली होती नोटीस
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान कायद्याच्या कचाट्यात सापडलेले अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची पुन्हा एकदा मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. मुंबईतील गावदेवी पोलिसांनी त्यांना यासंदर्भात नोटीस पाठवली होती. सदावर्ते यांच्यावर पाच गुन्हे दाखल असून मुंबई, सातारा, कोल्हापूर, अकोला आणि पुणे येथे हे गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा: 'आप'चं ठरलं! मुंबई महापालिका लढवणार; केल्या मोठ्या घोषणा
मुंबई पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर CrPC कलम 110 अंतर्गत कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार, गावदेवी पोलिसांकडून विशेष अधिकारनुसार ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. सदावर्ते यांच्यावर सध्या पाच गुन्हे दाखल असून मुंबई, सातारा, कोल्हापूर, अकोला आणि पुणे येथे हे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, या प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही सदावर्ते यांनी पुन्हा असे गुन्हे केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
हेही वाचा: 'आप'चं ठरलं! मुंबई महापालिका लढवणार; केल्या मोठ्या घोषणा
नोटीस राजकीय हेतून प्रेरित - सदावर्तेंचे वकील
सदावर्तेंचे वकिलांनी सांगितलं, ही नोटीस राजकीय हेतून पाठवण्यात आली आहे. या नोटिशीनुसार समाजात एखाद्या व्यक्तीला मोकळं सोडणं धोक्याचं आहे या कलमांतर्गत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. पण कोर्टात अद्याप काहीही सिद्ध झालेलं नसताना अशा प्रकारची नोटीस पाठवणं म्हणजे हा कोर्टाचा अवमान आहे.
Web Title: Gunaratna Sadavarten To Be Questioned Again Notice Sent By Gavdevi Police
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..