
'आप'चं ठरलं! मुंबई महापालिका लढवणार; केल्या मोठ्या घोषणा
मुंबई : दिल्ली आणि पंजाबनंतर आता मुंबई जिंकण्यासाठी आम आदमी पार्टीनं तयारी सुरु केली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपच्या मुंबई अध्यक्षा प्रीती मेनन यांनी मुंबकरांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. पालिकेत सत्ता आल्यास वीज-पाणी मोफत देण्यासह इतर महत्वाच्या घोषणा आपकडून करण्यात आल्या आहेत. (Aam Aadami Party to enter BMC election Big announcements made)
हेही वाचा: "कम्पाऊंडर महिला डॉक्टरांकडे विचारणा करतेय"; राणांचं पेडणेकरांवर टीकास्त्र
मेनन म्हणाल्या, जर आमची मुंबई महापालिकेत सत्ता आली तर मुंबईकरांना आम्ही वीज-पाणी मोफत देऊ सत्तेसाठी आम्ही कोणाशीही युती करणार नाही. गेल्या दहा वर्षांपासून आम्ही मुंबईकरांसाठी काम करत आहोत. आमचे ४० हजार कार्यकर्ते काम करत आहेत. मुंबईकरांना मुलभूत सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहिल असंही त्यांनी म्हटलंय आहे. यावेळी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा: 'लिलावती'च्या MRI रुममधील फोटो कोणी केले व्हायरल?; राजेश टोपेंचा इशारा
महाराष्ट्रात आम्ही सर्व निवडणुका लढवणार आहेत, पण मुंबई महापालिकेसाठी आमचं प्राधान्य रहणार आहे. भ्रष्टाचाराला विरोध हाच आमचा अजेंडा असेल तसेच सफाई, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण यांवर आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहोत. मुंबईतील नालेसफाईवर प्रश्न उपस्थित करुन मेनन यांनी भाजपवरही यावेळी टीका केली. भाजपने विरोधीपक्ष म्हणून आपली जबाबदारी योग्यरित्या सांभाळली नाही. यापूर्वी भाजप शिवसेनेसोबत महापालिकेत सत्तेत होती, पण मुंबईचे प्रश्न मार्गी लागले नाहीत, असा आरोपही आपकडून करण्यात आला आहे.
Web Title: Aam Aadami Party To Enter Bmc Election Big Announcements Made
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..