esakal | सासू सासऱ्यांकडून 'त्याचा' होत होता छळ
sakal

बोलून बातमी शोधा

 सासू सासऱ्यांकडून 'त्याचा' होत होता छळ

अखेर उचलले हे पाऊल

सासू सासऱ्यांकडून 'त्याचा' होत होता छळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : पत्नी आणि सासू-सासऱ्यांनी दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून दिघा भागातील धनंजय त्रिभूवन (24) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणात धनंजयची पत्नी व सासू-सासरे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. 

हेही वाचा - मिरा रोडचा तरुण चीनमध्ये बंदिस्त

धनंजय त्रिभूवन हा तरुण मूळचा जळगाव जिल्ह्यात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. वर्षभरापूर्वी दिघा येथील रूपाली पेठारे या तरुणीशी त्याचा विवाह ठरला; मात्र काही कारणांमुळे साखरपुडा झाल्यानंतर त्यांचा विवाह मोडला. त्यानंतर धनंजय व रूपालीची लहान बहीण अश्विनी पेठारे यांची फेसबुकवरून मैत्री झाल्यानंतर त्यांनी मागील मे महिन्यात प्रेमविवाह केला. धनंजयने मोठ्या मुलीशी ठरलेले लग्न मोडून लहान मुलीशी लग्न केल्याने अश्विनीच्या आई-वडिलांचाही लग्नाला विरोध होता.

महत्त्वाची बातमी - ...भाजपची एकहाती सत्ता येईल.

लग्नानंतर धनंजय व अश्विनी अवघे पाच महिने जळगाव येथे राहिले. त्यानंतर हे दोघेही दिघा येथे अश्विनीच्या घरी राहावयास आले. दरम्यान, मागील डिसेंबर महिन्यात धनंजयची आई दिघा येथे धनंजयला भेटण्यासाठी आली असताना त्याने त्याचे सासू-सासरे त्याच्याकडून स्वयंपाक करून घेऊन त्याला नोकरासारखी वागणूक देत नेहमी शिवीगाळ करत असल्याचे त्याने सांगितले होते. 

त्यामुळेच तो अश्विनीसह दुसरीकडे भाड्याने घर घेऊन राहत असल्याचेही त्याने सांगितले होते; मात्र तेथेही अश्‍विनी व धनंजय यांच्यात काही ना काही कारणांवरून भांडणे होत होती. ते एकमेकांना मारहाणही करत होते. त्याने याबाबतची माहिती आपल्या मोबाईलमध्ये साठवून ठेवल्याचेदेखील त्याने आपल्या आईला सांगितले होते.  त्यानंतर धनंजयच्या आईने त्याला जळगावला येण्यास सांगितले होते. त्यानंतर त्याने दोन दिवसांत गावी येणार असल्याचे सांगितले; मात्र दुसऱ्याच दिवशी (ता. 1 फेब्रुवारी) सायंकाळी धनंजयने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर धनंजयच्या कुटुंबियांनी रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात धनंजयची पत्नी अश्विनी, सासरे अशोक पेठारे, सासू अनिता पेठारे या तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती. 

web title : guy did sucide after continues troubles from wife and father and mother in law

loading image