...भाजपची एकहाती सत्ता येईल!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 16 February 2020

नवी मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची एकहाती स्वबळावर सत्ता येईल, असा विश्वास माजी मंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची एकहाती स्वबळावर सत्ता येईल, असा विश्वास माजी मंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला. भाजपच्या वतीने १५ व १६ फेब्रुवारी या दोन दिवशी राज्य परिषद अधिवेशनाचे  नेरूळ येथे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नेरूळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ही बातमी वाचली का? ठाण्यात लेक सिटी मॉलला आग

नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपातील काही नगरसेवक पक्षांतर करीत असल्याचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता, सर्व नगरसेवक पक्षाच्या सोबतच आहेत. काही हाताच्या बोटावर मोजण्याइतपत नगरसेवक जर पक्षांतराच्या वाटेवर असले, तर त्यामुळे फारसा फरक पडत नाही, असेही तावडे म्हणाले. शिवसेनेने जनादेशाचा अवमान केल्यानंतर भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या साह्याने सरकार स्थापन केले. त्यांनी जर चुकीचे निर्णय घेतले, तर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा ठराव आजच्या कार्यकारिणीमध्ये झाल्याची माहिती माजी मंत्री व भाजप नेते विनोद तावडे यांनी दिली. नेरूळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ही बातमी वाचली का? मिरा रोडवरील युवक चीनमध्ये बंदिस्त

राज्य परिषदेच्या सकाळच्या सत्रात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी भाजपच्या यापुढील संघटनात्मक आणि राजकीय वाटचालीविषयी मार्गदर्शन केले. शनिवारी (ता. १५) नेरूळ येथील तेरणा दंत महाविद्यालयात राज्य, जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकी झाल्या. या बैठकींमध्ये मंजूर झालेल्या ठरावांची माहिती तावडे यांनी दिली. 

ही बातमी वाचली का? वाहने उभी करण्यावरून दोन गटात हाणामारी

तावडे म्हणाले की, ८० दिवसांत राज्य सरकारने अनेक विषयांमध्ये दुटप्पी भूमिका घेत जनतेची फसवणूक केली. त्यामध्ये झोपड्या, शिवभोजन, मेट्रो कारशेड आदींसह अनेक योजनांमधून लोकांना फसवले आहे. अगोदरच्या भाजप सरकारने भ्रष्टाचार होऊ नये म्हणून अनेक योजना, भरती प्रक्रिया ऑनलाईन केल्या; पण आताच्या सरकारने सर्व कारभार ऑफलाईन सुरू केले असून त्यामधून आता मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होणार आहे. त्यामुळे या सरकारला उघडे पाडले जाईल, असेही त्यांनी सांगितले. या वेळी मंगळवारी होणाऱ्या अधिवेशनातील कार्यक्रमांची माहितीही तावडे यांनी पत्रकारांना दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP's will come to power in Navi Mumbai