esakal | जिम औषध विक्री प्रकरण : 'एफडीए'चा 'स्पेशल ड्राइव्ह'
sakal

बोलून बातमी शोधा

medicine

जिम औषध विक्री प्रकरण : 'एफडीए'चा 'स्पेशल ड्राइव्ह'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जिम मधील अवैध औषध विक्री विरोधात अन्न व औषध प्रशासनाने कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील उच्चभ्रू वस्तीमधील जिमच्या तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत. शिवाय लवकरच विशेष मोहीम आखून जिमच्या तपासण्या करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त डॉ. डी.आर.गहाणे यांनी सांगितले.

अभिनेते सिद्धार्थ शुक्ला यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे जिम मधील अवैध औषध विक्रीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.अन्न व औषध प्रशासनाकडे या विरोधात काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेण्यात आली आहे. मुंबईतील जिम मधील अवैध उत्तेजक द्रव्य विक्रीची तपासणी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा: देवेंद्र फडणवीसांवर भाजपने सोपवली नवी जबाबदारी

जिम मध्ये जाणाऱ्या तरुणांचा कमी दिवसात आकर्षक शरीरयष्टी बनवण्याकडे कल असतो. यासाठी जिम मधील प्रशिक्षकांकडून 'सप्लिमेंट फूड'चा मारा केला जातो. तरुणांना प्रोटीन पावडर आणि स्टेरॉईड दिले जाते. याचा तरुणांच्या शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबईतील काही जिम च्या तपासण्या केल्या आहेत. प्रत्यक्ष जिम मध्ये होत असलेल्या औषध विक्रीची तपासणी करण्यात येत आहे. शिवाय अनेक खासगी प्रशिक्षक औषधांचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यासाठी कारवाईची विशेष मोहीम आखली जात आहे.

अभिनेते सिद्धार्थ शुक्लांच्या मृत्यूनंतर काही तक्रारी प्राप्त झाल्या. त्याची दखल घेण्यात आली असून आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे विशेष मोहीम राबवून अवैध औषध विक्रीवर कडक कारवाई करणार.

- डॉ. डी.आर. गहाणे , सहाय्यक आयुक्त , अण्णा व औषध प्रशासन

उच्चभ्रू वस्तीमधील मोठ्या जिम मध्ये अवैध औषध विक्री करून तरुणांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. याबाबत आम्ही तक्रार ही केली असून यावर कडक कारवाई करण्यात यावी.

- अभय पांडे , राष्ट्रीय अध्यक्ष , ऑल फूड अँड ड्रग्स लायसेन्स होल्डर फाउंडेशन

loading image
go to top