Haji Ali Dargah: हाजी आली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Haji Ali Dargah mumbai Threat of terrorist attack

Haji Ali Dargah: हाजी आली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी

हाजी आली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुबंईत खळबळ माजली आहे. (Haji Ali Dargah mumbai Threat of terrorist attack )

मिळालेल्या माहितीनुसार, फोनवरील व्यक्तीने हाजीअली येथे १७ अतिरेकी येणार असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला मात्र कोणतिही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

ज्या नंबरवरून फोन आला होता. त्या नंबरवर पुन्हा फोन केला असता तो बंद असल्याचे आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. संबधित फोन हा उल्हासनगरहून आला असल्याचे तपासात समोर आले असून पोलिस फोन करणार्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Mumbai News