esakal | मुंबईतील हाजी अली, माहिम दर्ग्याच्या उत्पन्नावर मोठा परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

darga.jpg

सध्या राखीव निधी वापरण्याची वेळ...

मुंबईतील हाजी अली, माहिम दर्ग्याच्या उत्पन्नावर मोठा परिणाम

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: हाजी अली आणि माहिम दर्गा हे मुंबईतील दोन प्रसिद्ध दर्गे आहेत. येथे भाविक नेहमीच दर्शनासाठी येतात. खासकरुन सुट्टीच्या दिवशी या दोन दर्ग्यांमध्ये जास्त गर्दी असते. सध्या या दोन्ही दर्ग्याच्या व्यवस्थापनाला आर्थिक चिंता सतावत आहे. मागच्यावर्षीचा लॉकडाउन आणि आता पुन्हा ३० एप्रिलपर्यंत प्रार्थना स्थळे बंद ठेवण्याचा आदेश, या निर्णयाचा आर्थिक उत्पन्नावर परिणाम होण्याची भीती दर्गा व्यवस्थापनाला आहे. 

"लॉकडाउनमुळे मागच्यावर्षी फारशी आर्थिक देणगी जमा झाली नाही. आता आम्ही दर्ग्यातील देखभालीचा खर्च आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राखीव निधीचा वापर करत आहोत. दान पेट्यांमध्ये जमा होणाऱ्या रक्कमेवर आमचे संपूर्ण उत्पन्न अवलंबून असते. सध्या भाविकांना दर्शनाची परवानगी नाहीय. त्यामुळे पुन्हा एकदा उत्पन्नावर परिणाम होणार" असे सोहेल खांडवानी यांनी सांगितले. ते माहिम दर्ग्याच्या विश्वस्त मंडळावर आहेत. 

दिलीप वळसे-पाटील यांनी सुरुवातीला नाकारलं होतं गृहमंत्रीपद कारण....

मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव होतोय. कोरोनाचा हा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कठोर निर्बंध लागू केलेत. मॉल, हॉटेल, प्रार्थना स्थळे पूर्णपणे बंद केली आहेत. प्रवासावरही काही प्रमाणात निर्बंध घातले आहेत.  प्रार्थना स्थळांवर भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होतो, असे सरकारचे मत असल्याने त्यांनी प्रार्थनास्थळे ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवली आहेत. 

 
 

loading image