देयके थकल्याने हाफकीनचा औषध पुरवठा बंद करणार; 'ऑल फूड अँड ड्रग्स लायसेन्स होल्डर' फाउंडेशनचा इशारा

देयके थकल्याने हाफकीनचा औषध पुरवठा बंद करणार; 'ऑल फूड अँड ड्रग्स लायसेन्स होल्डर' फाउंडेशनचा इशारा
Updated on

मुंबई : पुरवठादारांची थकबाकी चुकती करा अन्यथा मंगळवार (ता. 15) पासून औषधांचा पुरवठा बंद करण्याचा इशारा ऑल फूड अँड ड्रग्स लायसेन्स होल्डर फाउंडेशन ने हाफकीन ला दिला आहे. मागील 10 महिन्यांपासूनचा ही देयके शिल्लक असून पुरवठादारांची साधारणता 103 कोटी रूपयांची थकबाकी आहे.  
एएफडीएलएचएफने हाफकीन इन्स्टिट्यूटला याबाबत पत्र लिहिले आहे. त्यात ते म्हणतात की , पुरवठादारांनी हापकीनला केलेल्या औषधांची देयके 8 महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रलंबित आहेत. या संदर्भात पुरवठादारांनी अनेकदा निवेदने व आंदोलने केली. त्यानंतर नोव्हेंबर पूर्वी पुरवठादारांची प्रलंबित बिले मंजूर केली जातील, असे सांगण्यात आले.  परंतु अद्याप यासंदर्भात विभागाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. 

थकीत देयके न मिळाल्याने पुरवठादारांवर वाईट परिणाम झाला असून त्यांचे जगणे कठीण झाले आहे. पुरवठादारांनी हाफकीन प्रशासनाकडे चर्चेसाठी वेळ देण्याची विनंती केली होती, मात्र वेळ देण्यास देखील प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप पुरवठादारांनी केला आहे. यावरून प्रलंबित देयकास मंजुरी देण्याबाबत हाफकीन प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप ऑल फूड अँड ड्रग्स लायसेन्स होल्डर फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी केला आहे.
देयकांच्या चौकशीसाठी पुरवठादारांच्या प्रतिनिधींना विभागात येण्यास परवानगी देखील जात नाही. त्यामुळे हाफकीन प्रशासन काहीतरी लपवायचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ही  पांडे यांनी केला आहे. हाफकीन प्रशासनाने पुरवठादारांकडे औषधं पुरवल्याच्या जुन्या पावत्या जमा न केल्याचे कारण पुढे केले आहे. मात्र या पावत्या सरकारचे अंतर्गत गोपनीय कागदपत्र आहे, जे सार्वजनिक केले जाऊ शकत नसल्याचे ही पांडे यांचे म्हणणे आहे.   
पुरवठादारांनी कर्ज घेऊन औषधांचा पुरवठा केला आहे. मात्र जुनी देयके थकल्याने पुढील पुरवठा करणे कठीण आहे. कोविड19 महामारी असल्याने आतापर्यंतचा पुरवठा सुरु ठेवला. मात्र पुरवठादारांची क्षमता आता संपली आहे. बहुतेक एमएसएमई उत्पादक बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे प्रलंबित देयके सोमवार पर्यंत देण्याची विनंती केली आहे , अन्यथा सोमवार पासून औषधांचा पुरवठा बंद करण्याचा इशारा ही अभय पांडे यांनी दिला आहे.

वैद्यकीय शिक्षण व संधोधन संचालनालय अतर्गत चालणारी 21 वैद्यकीय महाविद्यालय आहेत. तर सार्वजनिक आरोग्य विभागाशी संलग्न 34 छोटी-मोठी रूग्णालये आहेत. या रूग्णालयांना लागणारी औषधं हाफकीन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विकत घ्यावी लागतात. राज्य सरकारने 2018 मध्ये अध्यादेश काढून हा निर्णय घेतला.

हाफकीन इन्स्टिट्यूट निविदा मागवून औषधं खरेदी करते व ती रूग्णालयांना पुरवते. हाफकीन इन्स्टिट्यूटला राज्यभरातील 35 औषधं पुरवठादार वेगवेगळी वैद्यकीय उत्पादने पुरवतात. या पुरवठादारांनी हाफकीनला 2018 पासून औषधं तसेच वेगवेगळी शल्यचिकित्सेसाठी लागणारी सामग्री पुरवली आहे. थकीत 200 कोटी रूपयांमधील 100 कोटी रूपये देण्यात आले असून 103 कोटी रूपये अद्याप बाकी आहेत.

पुरावठादारांना बिलांचे पैसे देणे सुरू आहे. पुरावठादारांनी सादर केलेल्या बिलांमध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत,त्या दूर झाल्यानंतर उर्वरित बिलांचे पैसे देखील दिले जातील. 

डॉ रामेश्वर कुंभार ,
व्यवस्थापक , हाफकीन इन्स्टिट्यूट

Halfkins medicine supply will be cut off as paymen warning by AFDLH

-----------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com