तरूणांना धोका असणाऱ्या 'हॅपी हायपोक्झिया' रूग्णांची मुंबईत वाढ

जगात एकूण 30% हॅपी हायपोक्झियाचे रुग्ण
तरूणांना धोका असणाऱ्या 'हॅपी हायपोक्झिया' रूग्णांची मुंबईत वाढ

मुंबई: चालता बोलता असणारा रुग्ण दवाखान्यात गेला आणि अचानक गंभीर झाला. अचानक सर्व अवयवांमधील ऑक्सिजनची पातळी (Oxygen Level) खालावली. अगदी साधारण वाटणारा रुग्ण अचानक गंभीर होण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे हॅपी हायपोक्झिया. (Happy Hypoxia) हॅपी हायपोक्झियाचे रुग्ण सध्या मुंबईत वाढत असून म्युकरमायकोसीसनंतर (Mucormycosis) या आजाराचा धोकाही रुग्णांना आहे. कोरोना रुग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याची कोणतीच लक्षणं दिसत नाहीत. रुग्णालयाही याबाबत माहिती नसते आणि डॉक्टरांनाही खोलवर तपासणी केल्याशिवाय समजत नाही. ज्याला हॅपी हायपोक्सिया  किंवा सायलेंट हायपोक्झिया म्हणतात. हॅपी हायपोक्झियाच्या वर्गात मोडणारा रुग्ण वेळीच लक्षात आला नाही तर  त्यामुळे कोरोना रुग्णांचा मृत्यूही होतो. (Happy Hypoxia is dangerous for Youngsters spreading fast in Mumbai)

तरूणांना धोका असणाऱ्या 'हॅपी हायपोक्झिया' रूग्णांची मुंबईत वाढ
"RT-PCR निगेटिव्ह रिपोर्टची अट रद्द करा, अन्यथा..."

सामान्यपणे रुग्णाच्या शरीरातील प्राणवायूची पातळी कमी झाली की त्याला श्वास घायला त्रास होतो, घाम येतो, बोलायला त्रास होतो, कधी कधी तर व्यक्ती बेशुद्ध होते. पण कोरोनाच्या बाबतीत प्राणवायूची पातळी कमी झालेली कळत नाही आणि ते चांगले दिसत राहतात आणि अचानक मृत्यूच्या दाढेत जातात.

तरुणांना जास्त धोका - मुंबईतील पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसर्‍या लाटेत हॅपी हायपोक्झियाचे प्रमाण वाढले असून तरुणांना याचा सर्वाधिक धोका आहे. जगात याचे प्रमाण 30 टक्के असून प्रत्यक्षात मुंबईतील प्रमाण सांगणे कठीण आहे असे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. मोहन जोशी यांनी सांगितले.

पल्स ऑक्सिमीटरी करणे आवश्यक- लक्षण असताना किंवा नसताना पल्स ऑक्सिमीटरने दिवसातून दोनदा पल्स तपासणे आवश्यक आहे. जागतिक स्थरावर याचे प्रमाण 30 टक्के  आहे. त्यामुळे याबद्दल जनजागृती करणे गरजेचे असल्याचे डॉ. जोशी सांगतात. कोरोना रुग्णांमध्ये 'हॅप्पी हायपोक्सिया' ची लक्षणे आढळत असून ही लक्षणे जीवघेणी ठरत असल्याचे समोर आले आहे.  दीर्घकालीन आजार नसलेल्या तरुण रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण ही वाढतांना दिसत आहे. मृत्यू पावलेल्यांमध्ये मधुमेह, रक्तदाब, श्वसनविकार तसेच ह्रदयविकार यांसारख्या दीर्घकालीन आजारांचा त्रास नसल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. डॉ. जोशी सांगतात.

तरूणांना धोका असणाऱ्या 'हॅपी हायपोक्झिया' रूग्णांची मुंबईत वाढ
मुंबईकरांना दिलासा!! सक्रिय रुग्णांमध्ये 50 टक्क्याने घट

कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण हे वाढत आहे. त्यातील प्रकृती सामान्य असलेल्या तरुण रुग्णांच्या मृत्यूमुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अश्या रुग्णांमध्ये 'हॅप्पी हायपोक्सिझा' असल्याचे समोर आल्याने त्यांच्या मृत्यूमागील हे ही एक कारण असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'हॅपी हायपोक्झिया'मुळे धडधाकट दिसणाऱ्या रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण अचानक कमी होत असल्याने तब्येत खालावण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अशा रुग्णांसाठी सरकारने मार्गदर्शक सूचना बनवणे गरजेचे आहे.

कोरोना रुग्णांमध्ये 'हॅपी हायपोक्झिया' अडसर ठरत असल्याने प्रशासनाने काही उपाय योजना सुरू केल्या आहेत. कोरोना बाधित रुग्णांसह कंटेंटमेंट झोन मधील लोकांचे पल्स ऑक्सिमीटरच्या मदतीने ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यास सुरुवात केली असल्याचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले. 'हॅपी हायपोक्झिया' हा कोणताही नवा आजार नाही. कोरोनाची लक्षणे नसलेल्या काही रुग्णांमध्ये जरी याची लक्षणे सापडली असली तरी घाबरण्याचे कारण नसल्याचे ही डॉ आवटे यांनी सांगितले. प्रशासन योग्य ती काळजी घेत असल्याचे ही ते म्हणाले.

तरूणांना धोका असणाऱ्या 'हॅपी हायपोक्झिया' रूग्णांची मुंबईत वाढ
"सैरभैर चंद्रकांत पाटील यांना मानसिक उपचारांची गरज"

हॅपी हायपोक्सिया म्हणजे काय?

व्यक्तीच्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी होणे यास हायपोक्सिया असे म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीने आपल्या श्वासाद्वारे घेतलेला प्राणवायू श्वासातून फुफ्फुसात शोषला तेथून तो रक्तात त्यानंतर संपूर्ण शरीरात शोषला जातो . मात्र जेव्हा रक्तातील प्राणवायू कमी होतो तेव्हा मेंदुला होणारा प्राणवायूच्या पुरवठयात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे व्यक्तीला दम लागणे , गरगरणे , गुदमरणे , बेशुद्ध पडणे अश्या प्रकारचा त्रास जाणवू शकतो. मात्र काही व्यक्तींमध्ये शरीरातील प्राणवायूचे प्रमाण कमी झाले तरी त्याला वरील पैकी लक्षणे जाणवत नाहीत. त्याला 'हॅपी हायपोक्सिया' किंवा 'सायलेंट हायपोक्सिया' असे म्हटले जाते.

काय करावे??

1) ऑक्सिजन पातळी सातत्याने तपासावी. त्यानंतर रक्ताच्या तपासण्या कराव्यात. तसेच अशा व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवावे

2) गरज भासल्यास सिटीस्कॅन करावे

3)अँटिव्हायरल औषधे, ऑक्सिजनची योग्य व्यवस्था करावी.

4)ऑक्सिजन थेरपी देणे.

(संपादन- विराज भागवत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com