"RT-PCR निगेटिव्ह रिपोर्टची अट रद्द करा, अन्यथा..."

ठाकरे सरकारच्या नव्या निर्णयावरून संघटनेचा इशारा
कोरोना टेस्ट
कोरोना टेस्टSakal Media
Summary

ठाकरे सरकारच्या नव्या निर्णयावरून संघटनेचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात लॉकडाउन (Maharashtra Lockdown) १ जूनपर्यंत वाढवण्यात आला. गुरूवारी याबद्दलचा निर्णय जाहीर करण्यात आला. वाढीव कालावधीसाठी असलेल्या लॉकडाउनमध्ये (Lockdown Extension) काही नवे नियम जाहीर (New Guidelines) करण्यात आले. त्यात, महत्त्वाची बाब म्हणजे, बाहेरील राज्यांतून कोणीही महाराष्ट्रात येत असेल, तर त्या व्यक्तीला RT-PCR रिपोर्ट (Covid report) महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात यायचं असेल तर प्रवाशांनी ४८ तास आधीचा कोरोना निगेटिव्ह असल्याचा रिपोर्टसोबत ठेवणं बंधनकारक असणार आहे. या अटीवरून मालवाहतूकदारांमध्ये नाराजी असल्याचं चित्र आहे. राज्य सरकारने सबंधित निर्णय मागे घ्यावा अन्यथा आंदोलन केलं जाईल, असा इशारा ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस या वाहतूकदारांच्या शिखर संघटनेने दिला आहे. (Goods Transporters Union request to state govt to cancel rt pcr report compulsion)

कोरोना टेस्ट
"राऊतसाहेब, डोळे उघडा..."; भाजपच्या केशव उपाध्येंची टीका

राज्यात अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या चालकांना RT-PCR निगेटीव्ह अहवाल अनिवार्य करण्यात आलं आहे. परराज्यातून दररोज राज्यात मालवाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांना हा नियम परवडणारा नाही. यात मोठ्या प्रमाणात वेळेचा अपव्यय होतो. या निर्णयाचा विपरित परिणाम मालवाहतूक साखळीवर होऊ शकतो. त्यामुळे राज्य सरकारने सबंधित निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस या वाहतूकदारांच्या शिखर संघटनेने केली आहे.

कोरोना टेस्ट
महाराष्ट्रात येताय? मग ही कागदपत्रं सोबत ठेवाच...

ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेच्या कोअर कमिटीचे अध्यक्ष बाल मल्कित सिंह यांनी यासंबंधी अधिक माहिती दिली. संपूर्ण भारतातील वाहतूक व्यवस्था या निर्णयामुळे प्रभावित होईल. आगोदरच राज्यातील 70 टक्के मालवाहतूक वाहनांची चाकं थांबली आहेत. त्यात आता या निर्णयामुळे उर्वरित 30 टक्के मालवाहतूक वाहनेही बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे असा नियम ठेवू नये, अशी मागणी सिंह यांनी केली. तसेच, राज्य सरकारने निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com