एपीएमसी फळ मार्केटमध्ये स्पेन, ब्राझीलचा हापूस दाखल; ग्राहकांकडून अल्प प्रतिसाद

शुभांगी पाटील
Sunday, 25 October 2020

हापुस आंब्याची गोडी साऱ्या जगाला लागली असतानाच आता  भारतात देखील परदेशी आंबा दाखल होत आहे.

तुर्भे - हापुस आंब्याची गोडी साऱ्या जगाला लागली असतानाच आता  भारतात देखील परदेशी आंबा दाखल होत आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात  अफ्रिकन देशातील मलावी हापूस आंबा  भारतात दाखल झाला होता. तर आता सध्या मुंबई एपीएमसी फळ बाजारात स्पेन आणि ब्राझीलचा हापूस दाखल झाला आहे. मात्र याची किंमत जास्त असल्याने या फळाला तुलनेने मागणी कमी आहे अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

 रायगड जिल्ह्यात पावसाच्या भितीमुळे भात झोडणीची कामे वेगात

भारतातुन विशेषतः कोकणातील हापुस आंब्याला परदेशात खूप मोठी मागणी असते. त्याच प्रमाणे परदेशी फळांना देखील भारतीय बाजारात मागणी असते.मात्र सध्या वाशीतील  एपीएमसी फळ बाजारात स्पेन आणि ब्राझीलचा हापूस दाखल झाला आहे. 
ब्राझील आंब्याच्या दोन खेपात एकुण 50 पेट्या आंबा आला असून याची चव राजापुरी आंब्याप्रमाणे असून त्याची किंमत साडेचार किलोला( एक1पेटी ) 3600 ते 4000 रु आहे. तर स्पेन  वरून पाच बॉक्स, एक पेटी चार किलोचे असे 20.किलो स्पेन वरून आंबा दाखल झाला होता आणि एका पेटीला 3600 दर आहे. तर याला तोता पुरी चव आहे. मात्र, या परदेशी आंब्याची जरी चर्चा असली तरी देशी  आंब्या प्रमाणे या आंब्याला हवी तशी मागणी नाही. अशी माहिती  एपीएमसी  फळ  मार्केट मधील व्यापारी भरत देवकर यांनी दिली.

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hapus of Spain, Brazil enters APMC fruit market Short response from customers