esakal | कमळ सोडून हर्षवर्धन पाटील बांधणार शिवबंधन ? हर्षवर्धन पाटील शिवसेनेच्या वाटेवर ?
sakal

बोलून बातमी शोधा

कमळ सोडून हर्षवर्धन पाटील बांधणार शिवबंधन ? हर्षवर्धन पाटील शिवसेनेच्या वाटेवर ?

कमळ सोडून हर्षवर्धन पाटील बांधणार शिवबंधन ? हर्षवर्धन पाटील शिवसेनेच्या वाटेवर ?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

महाराष्ट्रातील सत्ता पालटलीये. आम्हीच सत्तेत बसणार म्हणणाऱ्या पक्षाला महाविकास आघाडीने विरोधात बसवलंय. अशातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आता केंद्रात जाणार या चर्चना देखील उधाण आलंय. फडणवीस यांना केंद्रात अर्थमंत्रीपद दिलं जाऊ शकतं अशी राजकीय कुजबुज ऐकायला मिळतेय. अशात फडणवीसांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणुकांवेळी मोठ्या प्रमाणात झालेल्या इनकमिंगचं काय होणार हा प्रश्न आहे.  

मोठी बातमी - बांगलादेशातील उपासमारीला कंटाळून आलो; सात महिलांना अटक!

आणि याच चर्चांना बळ देतायत नुकतेच भाजपवासी  झालेले आणि कायम पवार घराण्याला आव्हान देणारे इंदपूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटील पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नुकतीच भेट घेतलीये.  निवडणुकीपूर्वी भाजपात जाण्यासाठी चढाओढ होती, आता महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्याने वारे वेगळ्या दिशेने वाहू लागलेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीवर आरोप करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. इंदापूरात हर्षवर्धन पाटलांचा मोठा दबदबा देखील आहे. दरम्यान आता हर्षवर्धन पाटील वेगळा विचार करतायत का? असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण हर्षावर्धन पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी तब्बल तासभर केलेली चर्चा.

एकंदर मागचा विचार केला तर हर्षवर्धन पाटील हे पराभवाच्या गर्तेत अडकलेले पाहायला मिळतायत. यंदाची निवडणूक जिंकण्यासाठी पाटील यांनी प्रचंड मेहनत देखील घेतली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या आधीची विधानसभा देखील हर्षवर्धन पाटील हरले होते. यंदा शरद पवार यांनीच माझा पराभवाचा विडा उचलला होता अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी या आधी दिलीये.

मोठी बातमी - 'त्या' व्हायरल फोटोवरून अमोल कोल्हे भडकले..

आता महाराष्ट्रात राजकीय समीकरण बदलल्याने वेगळं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेऊन चर्चा केली. तब्बल तासभर ही भेट चालल्याचं बोललं जातंय. यंदाच्या विधानसभेत इंदापूर हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेला. काँग्रेसकडून इंदापूरसाठी मोठ्या प्रमाणात मागणी होत असताना देखील राष्ट्रवादीने इंदापूर सोडलं नाही.

बारामतीचा शेजारी असलेल्या इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा दबदबा आहे. दरम्यान पाटील हे पुन्हा वेगळा विचार करत असून ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील हे हातातील कमळ सोडून शिवबंधन बांधणार का? हा प्रश्न आता विचारला जातोय.

मात्र मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्याने हर्षवर्धन पाटलांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. इंडदापुरात साखर उद्योगावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो असं पाटील म्हणालेत. 

harshawardhan patil met uddhav thackeray is he planning to join shivsena is the question

loading image