
मुंबई : ‘‘ कर्जमाफी देऊ असे आश्वासन विधानसभा निवडणुकीत देऊन महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांची मते घेऊन सत्ता मिळवली पण आता ३१ मार्चपूर्वी पीककर्ज भरा, कर्जमाफी मिळणार नाही असे मुजोरपणे सांगत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कर्जमाफी मिळणार नाही, हे विधान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे,’’ असा संताप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.