Free Free Free ! लॉकडाऊनमध्ये प्रतिष्ठित हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे मोफत ऑनलाईन कोर्स 'करोना'

Free Free Free ! लॉकडाऊनमध्ये प्रतिष्ठित हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे मोफत ऑनलाईन कोर्स 'करोना'

मुंबई : सध्या कोरोनामुळे संपूर्ण जगात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे लोक आपल्या घरातच आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. काही लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत तर काही लोकांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र या लॉक डाऊनच्या काळात लोकांनी काहीतरी शिकत राहावं म्हणून हार्वर्ड युनिव्हर्सिटी (HARVARD UNIVERSITY) नं मोफत ऑनलाईन कोर्सेस सुरु केले आहेत.

या ऑनलाईन कोर्सेसमध्ये अगदी धार्मिक गोष्टींपासून ते थेट गेम डेव्हलपमेंट आणि डेटा सायन्सपर्यंत अशा निरनिराळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत. हार्वर्डकडून अशा प्रकारचे  एकूण ६४ फ्री ऑनलाईन कोर्सेस HARVARD UNIVERSITY च्या वेबसाइटवरून तुम्हाला करता येणार आहेत. त्यामुळे ऑनलाईन कोर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

हे आहेत फ्री ऑनलाईन कोर्सेस:

टेक्नोसॅव्ही लोकांसाठी Web Programming, Python, JavaScript, Introduction to game Development, Introduction to Computer Science, Mobile App Development अशा प्रकारचे कोर्स उपलब्ध आहेत. हे सर्व कोर्स ११-१३ आठवड्यांचे आहेत.

ज्या लोकांना आकड्यांमध्ये खेळायला आवडतं त्यांच्यासाठी Principles, Statistical and Computational Tools for Reproducible Science हा कोर्स उपलब्ध आहे. या कोर्समध्ये तुम्हाला Data Analysis कसा करायचा हे शिकवण्यात येणार आहे. तसंच तुमचा स्वतःचा रिसर्च पेपरही तुम्हाला बनवता येणार आहे. हा कोर्स ८ आठवड्यांचा असणार आहे. यासोबतच Data Science चा २-८ आठवड्यांचा कोर्सही करता येणार आहे.

आरोग्य आणि वैद्यकीय प्रशिक्षणाचेही Lessons from Ebola, The FDA and Prescription Drugs, Improving Global Health असे काही कोर्सेस यात उपलब्ध आहेत.

यात काही धर्मांशी निगडित कोर्सेसही आहेत यात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन अशा धर्मांबद्दल माहिती देण्यात आली आहे. लॉ,अर्थशास्त्र, गणित यांचे काही कोर्सेस देखील उपलब्ध आहेत. तसंच यात जगातल्या काही भाषांचेही कोर्सेस आहेत.

हे फ्री ऑनलाईन कोर्स करण्यासाठी तुम्हाला HARVARD UNIVERSITY च्या www.online-learning.harvard.edu या वेबसाईटवर जाऊन स्वतःला या कोर्सससाठी रजिस्टर करावं लागणार आहे.

harvard university is offering free online courses during covid lockdown check details

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com