esakal | हाथरस घटना : पीडितेच्या कुटुंबीयांना भेटू न देणे म्हणजे मोदी आणि योगींची पाशवी दडपशाही - नितीन राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

हाथरस घटना : पीडितेच्या कुटुंबीयांना भेटू न देणे म्हणजे मोदी आणि योगींची पाशवी दडपशाही - नितीन राऊत

हाथरस सारख्या घटना भाजपच्या राज्यात यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत - नितीन राऊत 

हाथरस घटना : पीडितेच्या कुटुंबीयांना भेटू न देणे म्हणजे मोदी आणि योगींची पाशवी दडपशाही - नितीन राऊत

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई, ता. 1 : हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी जाणाऱ्या राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना अडवून योगी आदित्यनाथ सरकारने दडपशाहीचा प्रयत्न केल्याची टीका काँग्रेसचे अनुसूचित जाती जमातीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत यांनी केली आहे.  

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व खासदार राहुल गांधी व नेत्या प्रियांका गांधी वधेरा यांना अडवून त्यांना धक्काबुक्की करून उत्तर प्रदेश पोलिसांनी खाली पाडले. राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतले आहे. मोदी व योगी आदित्यनाथ यांची ही पाशवी दडपशाही असल्याची टीका करून या वृत्तीचा राऊत यांनी निषेध केला आहे. 

महत्त्वाची बातमी : "योगीजी एसआयटी चा खेळ पुरे करा"; हाथरस पोलिस कारवाईवर मुंबई काँग्रेसची तीव्र टीका

हाथरस सारख्या घटना भाजपच्या राज्यात यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. तेथे जात असताना राहुल गांधी यांची पोलिसांनी कॉलर धरली व धक्काबुक्की करून जमिनीवर पाडले, ही घटना अतिशय निंदनीय असल्याची प्रतिक्रिया डॉ. राऊत यांनी व्यक्त केली आहे. अन्यायग्रस्त दलित कुटुंबांना भेटण्यासाठी काँग्रेसचे नेते यापूर्वी गेले असता योगी सरकारने त्यांना अडवून भेटू न देण्याचा प्रयत्न केला होता, याची आठवणही त्यांनी करून दिली आहे. उत्तर प्रदेश मध्ये दलित कुटुंब सुरक्षित नसल्याची भावनाही डॉ. राऊत यांनी व्यक्त केली.

( संपादन - सुमित बागुल ) 

hathras incident congress leader nitin raut condemn act of UP police