हॅट्स-ऑफ धारावीकर | तब्बल 4 महिण्यानंतर धारावी कोरोनामुक्त; आरोग्य विभागाची कौतुकास्पद कामगिरी

मिलिंद तांबे
Friday, 25 December 2020

अखेर 4 महिन्यानंतर धारावी अखेर कोरोनामुक्त झाली. धारावीत आज एक ही नव्या रुग्णाची नोंद झाली नाही. 1 एप्रिल राजी धारावीत पहिला कोरोना बाधित रुग्ण सापडला होता.

मुंबई :  अखेर 4 महिन्यानंतर धारावी अखेर कोरोनामुक्त झाली. धारावीत आज एक ही नव्या रुग्णाची नोंद झाली नाही. 1 एप्रिल राजी धारावीत पहिला कोरोना बाधित रुग्ण सापडला होता. धारावीत एकूण 12 सक्रिय रुग्ण असून केवळ 8  रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. तर 4 रुग्ण कोव्हिडं काळजी केंद्र 2 मध्ये आहेत. धारावीतील एकूण रूग्णसंख्या 3,788 इतकी आहे. 

मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जी उत्तरमध्ये आज 14 नविन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. दादर मध्ये आज केवळ 8 नवीन रुग्ण सापडला असून रुग्णांची एकूण संख्या ही 4,750  इतकी झाली आहे. तर 106 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीम मध्ये ही आज 6 नवीन रुग्णांची भर पडली असून रुग्णांची संख्या 4,561 इतकी झाली आहे. तर 212 एक्टीव्ह रूग्ण आहेत.

तर धारावी,दादर,माहिम परिसराचा समावेश असणा-या जी उत्तर विभागात आज 14 नविन रुग्णांची भर पडली असून रूग्णांचा एकूण आकडा 13,099 वर पोहोचला आहे. तर 330 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जी उत्तरमध्ये आतापर्यंत 656 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. धारावीमध्ये 3,464,दादरमध्ये 4,471 तर माहीम मध्ये 4,505 असे एकूण 12,140 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

Christmas | माथेरानमध्ये ख्रिसमसनिमित्त पर्यटकांचे अनोखे स्वागत; पालिकेकडून आकर्षक सजावट

धारावीसाठी ट्रेसिंग,ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि आणि ट्रीटमेंट वर भर देण्यात आला होता. यासाठी सर्वांनी अथक मेहनत घेतली. अनेक अदृश्य हात देखील ह्यात सहभागी झाले. हे धारावी मॉडेल चे यश आहे. 
किरण दिघावकर ,
सहाय्यक आयुक्त 

 

पालिका प्रशासनाने चार सूत्री कार्यक्रम पालिकेने राबविला. घरोघरी तपासणी, कॉन्टॅक्त  ट्रेसिंग मोहीम आम्ही राबविल्या. त्यामुळे दाट लोकवस्ती असूनही आम्ही कोविडला हरवू शकलो.

किशोरी पेडणेकर ,
महापौर

----------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hats off Dharavikar Dharavi corona free after 4 months Admirable performance of the health department