धक्कादायक! म्हणून त्याने पत्नीला व्हिडीओ कॉल करून दिला ट्रिपल तलाक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 February 2020

मुंबई: तिहेरी तलाकमुळे मुस्लिम महिलांवर अन्याय होत असल्याने, केंद्र सरकारने तिहेरी तलाक विरोधी कायदा केला. परंतु तरीदेखिल तिहेरी तलाक देणाऱ्यांची संख्या कमी झालेली दिसत नाही. नवी मुंबईत नुकतीच व्हिडिओ कॉलवर तिहेरी तलाक दिल्याची विचित्र घटना समोर आली आहे.

मुंबई: तिहेरी तलाकमुळे मुस्लिम महिलांवर अन्याय होत असल्याने, केंद्र सरकारने तिहेरी तलाक विरोधी कायदा केला. परंतु तरीदेखिल तिहेरी तलाक देणाऱ्यांची संख्या कमी झालेली दिसत नाही. नवी मुंबईत नुकतीच व्हिडिओ कॉलवर तिहेरी तलाक दिल्याची विचित्र घटना समोर आली आहे.

नक्की काय आहे प्रकरण: 
या महिलेचे लग्न एप्रिल २०१८ मध्ये झाले होते. लग्नानंतर ती नवऱ्यासोबत कळंबोलीला राहत होती. सासू-सासऱ्यांसोबत तिचे भांडण झाले. त्यामुळे महिला कांदिवली पूर्वेला तिच्या आई-वडिलांसोबत रहायल आली होती. त्यामुळे तिच्या बहिणीने मध्यस्थी करण्यासाठी तिच्या नवऱ्याला फोन केला होता. हे तिघेही कॉन्फरन्स कॉलवर बोलत असताना अचानक पीडित महिलेच्या नवऱ्याने  तिला फोनवरच तीन तलाक दिला. यामुळे घाबरलेल्या महिलेने कांदिवलीच्या समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

महत्वाची बातमी : मुंबईतील आगीच्या घटना येणार नियंत्रणात!

सासरच्या लोकांनी या महिलेच्या आईवडीलांकडे महागड्या वस्तूंची मागणी केली होती. त्या वस्तू आईवडीलांनी पुरवल्याही होत्या. मात्र, त्यानंतर महिलेच्या पतीने पुन्हा तिच्या घरच्यांना पैसे मागायला सुरूवात केली. रोजच्या मानसिक आणि शारिरीक तणावामुळे महिलेचा गर्भपातही झाला. मात्र, यासाठी सासू-सासऱ्यांनी तिलाच दोषी ठरवले आणि माहेरून पैसे आणण्याची बळजबरी सुरूच ठेवली, अशी तक्रार महिलेने केली आहे.

पतीवर या आधीही होते फसवणुकीचे गुन्हे:
या महिलेच्या पतीविरोधात कळंबोली, मुंब्रा आणि मानखुर्द पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे या महिलेला लग्नानंतर समजले होते. मात्र, आता या महिलेने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिस पुढचा तपास करीत आहेत.

 He made a video call to his wife and get Triple Divorce


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He made a video call to his wife and get Triple Divorce