esakal | महत्वाची बातमी : मुंबईतील आगीच्या घटना येणार नियंत्रणात!

बोलून बातमी शोधा

महत्वाची बातमी : मुंबईतील आगीच्या घटना येणार नियंत्रणात!

मुंबईत 18 अद्ययावत अग्निशमन केंद्रे उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. आगी लागण्याचे प्रमाण वाढत असल्याने मोठी आणि मध्यम स्वरूपाची ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत. 

 

महत्वाची बातमी : मुंबईतील आगीच्या घटना येणार नियंत्रणात!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत 18 अद्ययावत अग्निशमन केंद्रे उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. आगी लागण्याचे प्रमाण वाढत असल्याने मोठी आणि मध्यम स्वरूपाची ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत. 
कांदिवली पूर्व ठाकूर व्हिलेज, सांताक्रूझ पश्‍चिम जुहू तारा रोड आणि कांजूरमार्ग येथे मोठी अग्निशमन केंद्रे; तर घाटकोपरमध्ये रमाबाई आंबेडकर रोड, बोरिवलीजवळ गोराई, माहुल आणि विक्रोळीत गोदरेजजवळ मिनी केंद्र उभारण्यात येणार आहेत. मुंबईची व्याप्ती पाहता सध्या 70 अग्निशमन केंद्रांची गरज आहे. सध्या मुंबईत मोठी 35 आणि मिनी 17 केंद्रे आहेत.

ठाकरे सरकारविरोधात 'ते' झालेत आक्रमक!

आग लागल्यानंतर किमान दहा मिनिटांच्या आत घटनास्थळी बचावकार्य सुरू होणे गरजेचे असते; मात्र मुंबईतील वाहतूक कोंडी आणि उपलब्ध साधनसामग्रीमुळे यावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे अग्निशमन केंद्रांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. यामध्ये ठाकूर व्हिलेज कांदिवली व एल. बी. एस. मार्ग, कांजूरमार्ग येथे अग्निशमन केंद्र बांधण्याचे काम नगर अभियंता खात्याने सुरू केले आहे. जुहू तारा रोड, सांताक्रूझ येथे फायर स्टेशनसाठी राखीव असणारा भूखंड अग्निशमन दलाच्या ताब्यात देण्यात आला असून या ठिकाणीही लवकरच सुसज्ज अग्निशमन केंद्र बांधण्यात येणार आहे. उर्वरित केंद्रांसाठी विकास आराखड्यानुसार जागा मिळण्यासाठी राज्य सरकारडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासने दिली. 

सावरकरांच्या गौरव प्रस्तावावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला 'हा' निर्णय

गतिमान सेवेसाठी प्रयत्न 
वेगाने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू करण्यासाठी अग्निशमन दलाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये 64 मीटरपेक्षा जास्त उंचीचे हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म, ड्रोन्स, हॅजमॅट वाहने, 55 मीटर उंचीचे वॉटर टॉवर, फायर रोबोट, जलद प्रतिसाद वाहने अशा उपकरणांची खरेदी केली जात आहे. यंत्रे खरेदीकरिता 85.42 कोटी; तर अग्निशमन केंद्रांच्या बांधकामांसाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात 19.02 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.