चौकात उधळले मोदी...! सेना राष्ट्रवादी जवळ बरे : सुप्रिया सुळेंचे दिलखुलास उत्तर

तुषार सोनवणे
Saturday, 24 October 2020

लेखक अंबरीश मिश्र यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात चौकात उधळले मोतीचा उल्लेख चौकात उधळले मोदी असा करत भाजप नेते आशीष शेलार यांनी शाब्दिक कोटी केली

मुंबई - आम्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना जवळच बरे.. सुप्रिया सुळे यांनी संजय राउतांना उद्देशून विधान केले अन ज्येष्ठ पत्रकार लेखक अंबरीश मिश्र यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात चौकात उधळले मोतीचा उल्लेख चौकात उधळले मोदी असा करत भाजप नेते आशीष शेलार यांनी शाब्दिक कोटी केली.

अर्णब गोस्वामी पुन्हा गैरहजर! "कारणे दाखवा'साठी पोलिसांत येणे टाळले

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाच्या  रंगस्वर सभागृहात लॉकडाऊननंतर सुरु झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने रंगली ती राजकीय मैफल.लॉकडाउनच्या काळात अंबरीश मिश्र उर्दू शायरांवर छोटे वेचे  लिहित राहिले अन त्याचे पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे काढण्यात आले.आज खासदार सुप्रिया सुळे ,सामनाचे कार्यकारी संपादक संजय राउत, भाजपचे आशीष शेलार आणि प्रतिष्ठानचे संचालक निवृत्त सनदी अधिकारी शरद काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन झाले.आम्ही चौकात उधळलेलेच असतो असा प्रारंभ करीत संजय राउतांनी खुमासदारीचा परिचय दिला.

नागरिकांची दिशाभूल टाळण्यासाठी कोव्हिड जाहिरातींबाबत आचारसंहिता जारी 

त्यानंतर आशीष शेलार यांनी सुप्रियाताई केंव्हाही इकडे येवू शकतात अशी पुस्ती जोडली. मात्र सुप्रिया सुळे यांनी आम्ही शिवसेनेशेजारीच बरे आहोत असे सांगत दिलखुलास हास्य केले. उर्दूभाषेवर बंदी आणण्याचा प्रयत्नही संसदेत झाला असे सांगून संजय राउत यांनी भाषा संस्कृती याबाबत खंत व्यक्त केली.भाषेवर प्रेम करायला हवे ,भाषा संस्कृतीची वाहक असते असे लेखक अंबरीश मिश्र म्हणाले.

----------------------------------------------

Healed near Shiv Sena NCP Supriya Sules heartfelt reply


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Healed near Shiv Sena NCP Supriya Sules heartfelt reply