कोरोना दूर ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने सांगितलीत ही 12 सुत्र

समीर सुर्वे
गुरुवार, 16 जुलै 2020

मुंबईसह देशातील अनेक भागांमध्ये आता लॉकडॉऊन शिथील होऊ लागलाय.  लॉकडॉऊन शिथील झाल्यानंतर मुुंबईसह महामुंबईतील काही भागात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.

मुंबई : मुंबईसह देशातील अनेक भागांमध्ये आता लॉकडॉऊन शिथील होऊ लागलाय.  लॉकडॉऊन शिथील झाल्यानंतर मुुंबईसह महामुंबईतील काही भागात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे आता कोरोनाला दूर ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने 12 सुत्र सांगितली आहेत. या 12 सूत्रांमध्ये 6 फुटांचे अंतर, पुनर्वापर करता येईल असे मास्क, लांबून अभिवादन हे पुर्वी पासूनचे सल्ले आहेतच आहेत. त्याचबरोबर प्रवासी वाहतूकही सुरु झाली आहे. मात्र, अत्यावश्यक असेल तरच प्रवास करा असा सल्ला देण्यात आला आहे.

मोठी बातमीमुंबईत कोरोना हळूहळू येतोय नियंत्रणात.. पण मृत्यदर जास्तच..'हे' आहेत नवीन हॉटस्पॉट...

कोविड साथीच्या काळात वैयक्तीक स्वच्छता महत्वाची आहे. त्यामुळे नियमीत हात धुणे आणि वैयक्तीक स्वच्छता पाळणेही महत्वाचे असल्याचे आरोग्य मंत्रालयाने नमुद केले आहे. तसेच वारंवार स्पर्श होणाऱ्या घरातील जागा वस्तूंचे नियमीत निर्जंतुकीकरण करा. त्याचबरोबर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करुन सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये असेही यामध्ये नमुद करण्यात आले आहे. गर्दीची ठिकाणे याकाळात टाळण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. कोविडमध्ये खोकला, श्वास घ्यायला होणार त्रास,  तसेच ताप अशी लक्षणे आढळतात ही लक्षणे असल्यास वैद्यकिय सल्ला घ्यावा. त्याचबरोबर अधिकृत स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

( संकलन - सुमित बागुल )

health and kutumba kalan mantralaya shared 12 formulae to keep covid away from mumbai  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: health and kutumba kalan mantralaya shared 12 formulae to keep covid away from mumbai