esakal | मुंबईत कोरोना हळूहळू येतोय नियंत्रणात.. पण मृत्यदर जास्तच..'हे' आहेत नवीन हॉटस्पॉट..  
sakal

बोलून बातमी शोधा

corona

मुंबईतील 70 टक्के रुग्णांनी आता पर्यंत कोविडवर मात केली असून रुग्ण वाढीचा दर 1.35 टक्क्यांवर पोहचला.

मुंबईत कोरोना हळूहळू येतोय नियंत्रणात.. पण मृत्यदर जास्तच..'हे' आहेत नवीन हॉटस्पॉट..  

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई: मुंबईतील 70 टक्के रुग्णांनी आता पर्यंत कोविडवर मात केली असून रुग्ण वाढीचा दर 1.35 टक्क्यांवर पोहचला. मात्र, मृत्यूदर आजही 5.72  टक्के आहे. जग, अमेरिका, भारत आणि महाराष्ट्र पेक्षाही हा जन्मदर जास्त आहे.राज्यातील मृत्यूदर 3.96 टक्के आहे.

मुंबईत मंगळवारपर्यंत 92 हजार 193 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 65 हजार 466 रुग्णांनी कोविडवर मात केली तर 5 हजार 450 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 21 हजार 450  रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

हेही वाचा: अरे वाह! दुबईत अडकून पडलेले तब्बल 'इतके' श्रमिक महाराष्ट्रात दाखल; उद्योजक धनंजय दातार यांची मदत..  

कोविड संक्रमण कमी करण्यासाठी पालिका आयुक्त इक्बास सिंह चसल यांनी 22 रोजी शीघ्रकृती योजना जाहीर केली. यात संशयीत रुग्ण शोधून त्यांची चाचणी विलगीकरण तत्काळ उपचार सुरु करण्यात येत आहेत. यामुळे कोविडचे संक्रमण रोखण्या बरोबरच मृत्यूदर ही कमी होणार होता. 

22 जून रोजी मुंबईत कोविडचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 37 दिवसांचा होता. तर 14 जूलै पर्यंत हा कालावधी 52 दिवसांवर आला आहे.असा दावा महापालिकेने केला. मात्र, मृत्यूदर आजही 5 टक्क्यांच्या पुढे आहे.अमेरिकेचा मृत्यूदर 4 ते 5 टक्क्या दरम्यान आहे. जगाचा 4.37,देशाचा 2.57  आणि महाराष्ट्राचा 3.96  टक्के आहे.

महापालिकेने दिलेल्या महितीनुसार 1 जूलै रोजी 57 टक्के रुग्णांनी कोविडवर मात केली होती.तर आज ही संख्या 70 टक्क्यांंपर्यत  पोहचली आहे.

मृत्यूदराचे हॉटस्पॉट:

चेंबूर - 8.57 टक्के

वांद्रे पुर्व - 8.50 टक्के 

कुर्ला - 8.38  टक्के 

हेही वाचा: अरे बापरे!  लॉकडाऊन काळात तणावासोबत वाढतोय संताप; 'हे' आहे मुख्य कारण..वाचा महत्वाची बातमी..

सर्वात कमी मृत्यूदर:

कांदिवली -- 2.77 टक्के 

मुलूंड -- 2.98 टक्के 

बोरीवली -- 3.12 टक्के 

संपादन : अथर्व महांकाळ 

corona is in control in mumbai but there is something to worry