उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली! टेक्‍नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडियाच्या कामगारांचे आंदोलन 

उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली! टेक्‍नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडियाच्या कामगारांचे आंदोलन 

मुरबाड ः टेक्‍नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया लि., धानिवली मुरबाड या कंपनीचा पॉवर डिव्हिजन प्लॅन्ट बंद झाल्याने कामगार बेकार झाले. त्यामुळे त्यांनी उपोषणास सुरू केले होते. दरम्यान, उपोषणाला बसलेल्या कामगारपैकी एकाची प्रकृती शुक्रवारी खालावल्याने वातावरण चिघळले. प्रकृती खालावलेल्या उपोषणकर्त्याचे नाव वसंत भोईर असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

उपोषणकर्त्याची प्रकृती खालावल्याने शनिवारी सकाळी धानिवली गावातील महिलांनी कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या दिला आहे. ग्रामस्थांनी या उपोषणास पाठिंबा दर्शविला आहे. पॉवर डिव्हिजन प्लॅन्ट बंद झाल्याने स्थानिक 54 कामगार बेकार झाले आहेत. त्यापैकी चार जण उपोषणास बसले असून 50 कामगारांनी उपोषणास पाठिंबा दर्शविला आहे. उपोषणास बसलेल्या वसंत भोईर यांची प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कामगारांना पाठिंबा देण्यासाठी धानिवली गावातील महिला कंपनीच्या गेटवर धरणे धरून बसल्या आहेत; तर लेबर फ्रंट युनियनचे रवींद्र चांदने, मुरबाड पंचायत समितीचे सभापती श्रीकांत धुमाळ, मुरबाड शहर शिवसेनाप्रमुख रामभाऊ दुधाळे यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला आहे. 

कामगार युनियन सीटूचे मुरबाड तालुका अध्यक्ष दिलीप कराळे व सरचिटणीस सागर भावार्थे यांनी पॉवर प्लांट सुरू करायचा नसेल, तर इतर प्लॅन्टमध्ये या कामगारांना सामावून घ्या, अशी मागणी केली आहे. गेटवर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपूजे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोराटे घटनास्थळी तळ ठोकून आहेत. 

The health of the fasting person deteriorated Movement of Technocraft Industries India workers

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com