esakal | भारतात तयार होणाऱ्या कोरोनावरील लसीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणालेत की....
sakal

बोलून बातमी शोधा

rajesh tope

आज यासंदर्भात आयसीएमआरचे संचालक डॉ. भार्गव यांच्याशी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार साधारपणे महत्वाच्या 13 ते 14 हॉस्पीटल्समध्ये या लसीबाबत क्लिनीकल ट्रायल्स करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

भारतात तयार होणाऱ्या कोरोनावरील लसीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणालेत की....

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोना प्रतिबंधासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमार) आणि भारत बायोटेकइंटरनॅशनल लिमिटेड (बीबीआयएल) यांच्या एकत्रित प्रयत्नातून पहिली भारतीय लस तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याच्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये यश मिळाल्यावर भारतात निर्मित होणाऱ्या या लसीबाबत आशादायी असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

...म्हणून केरळहून आलेलं वैद्यकीय पथक माघारी परतलंय; जाणून घ्या काय झालं तर...

यासंदर्भात आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, आज यासंदर्भात आयसीएमआरचे संचालक डॉ. भार्गव यांच्याशी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार साधारपणे महत्वाच्या 13 ते 14 हॉस्पीटल्समध्ये या लसीबाबत क्लिनीकल ट्रायल्स करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

मंत्री महोदय म्हणतात, 'कोरोनिल'ने कोरोना बरा होत नाही; खबरदार संभ्रम निर्माण केला तर...

7 जुलैपर्यंत या क्लिनीकल ट्रायल्स व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर प्री-क्लिनीकल आणि क्लिनिकल ट्रायलचे काम पूर्ण होऊन पहिली भारतीय बनावटीची लस साधारणपणे 15 ऑगस्टपर्यंत तयार करण्याचे उद्दीष्ट असल्याचे डॉ. भार्गव यांनी सांगितल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. याबाबत मी आशादायी असून सर्व बाबी वेळेत पूर्ण झाल्यास आपल्या देशाची पहिली लस आयसीएमआर-बीबीआयएल यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार होऊ शकेल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

loading image