esakal | म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी मानले केंद्र सरकारचे आभार

बोलून बातमी शोधा

Rajesh Tope thanked the Central Government
म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी मानले केंद्र सरकारचे आभार
sakal_logo
By
पूजा विचारे

हेही वाचा: NIAचे नवे महानिरीक्षक मनसुख हिरेनच्या घरी

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. राज्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिक कामाच्या निमित्ताने सतत घराबाहेर असतात. त्यामुळे बाधितांमध्ये या वयोगटातील रुग्णांची संख्या देखील जास्त असल्याने त्या पार्श्वभूमीवर या वयोगटातील नागरिकांचेही लसीकरण करावे, अशी मागणी सातत्याने केंद्र शासनाकडे केल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. राज्याने केलेल्या या मागणीची दखल घेऊन केंद्र शासनाने 1 मेपासून 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचा निर्णय घेतला आहे.

राज्यात 18 ते 44 वयोगटातील लोकसंख्या अंदाजे 50 टक्क्यांपर्यंत असून युवा वर्गाने आता लसीकरणात सक्रीय सहभाग नोंदवून लसीकरण करून घ्यावे. जेणेकरून कोरोनाला रोखणे शक्य होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात लसीकरणाला गती देतानाच दररोज आठ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.