भन्नाट ! हा अनोखा 'रक्षक' तपासणार तापमान, नाडी आणि रक्तातील ऑक्सिजनची टक्केवारी

प्रशांत कांबळे
बुधवार, 29 जुलै 2020

 रेल्वेच्या भायखळा रुग्णालयात आरोग्य सहाय्यक 'रक्षक' रोबोट दाखल

मुंबई : मध्य रेल्वेच्या कुर्ला EMU कारशेडमध्ये तयार करण्यात आलेला 'रक्षक रोबोट' तुमचं तापमान, नाडी, ऑक्सिजन टक्केवारी यासारखे आरोग्यविषयक मापदंड मोजणार आहे. स्वयंचलित सॅनिटायझर, इन्फ्रारेड सेन्सरची सुविधा असलेल्या या रोबोटची निर्मिती कुर्ला ईएमयु कारशेडने केलीये. सध्या हा रोबोट भायखळा येथील भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरीयल हॉस्पिटलला सुपूर्द करण्यात आला आहे. 

काय आहे रोबोटची विशेषता ? 

  • पूर्ण चार्ज झालेल्या बॅटरीसह 'रक्षक' रोबोट सतत 6 तास काम करू शकतो.
  • रोबोच्या ट्रेमध्ये 10 किलोपर्यंतच्या वस्तूची वाहतूक करता येऊ शकते.
  • रक्षक रोबोट वायफायवर आधारित आहे आणि त्यामुळे मोबाईल आवश्यकता भासत नाही
  • 'रक्षक' रोबोट अँड्रॉइड मोबाईलद्वारे ऑपरेट होतो
  • रुग्णांचा व्हिडिओ आणि छायाचित्रण देखील यावरून डाउनलोड करता येतं 

मोठी बातमी - खुशखबर! मुंबईत कोरोना रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण घसरतंय... वाचा कोणी दिली ही माहिती

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कुर्ला येथील EMU कारशेडमध्ये कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी आरोग्य सहाय्यक रोबोट 'रक्षक' तयार करण्यात आला आहे. हा रोबोट रूग्णांना औषध देणे, भोजन पोहोचवणे, आणि डॉक्टर आणि रुग्णांमध्ये एकमेकाशी व्हिडिओ संवाद सुद्धा करू शकणार आहे. 150 मीटर अंतरापर्यंत  रिमोट ऑपरेशनद्वारे सम पातळीच्या पृष्ठभागावर सर्व दिशेने रोबोटला फिरता येणार आहे. 

विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोएल यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल रूग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय संचालिका डॉ. मीरा अरोरा यांच्याकडे हा रोबोट 'रक्षक' सुपूर्द केला आहे. वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता सुनील बैरवा आणि त्यांच्या टिमने या रोबोची रचना केली आहे. 

health robot rakshak made by kurla carshed EMU ready to serve people

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: health robot rakshak made by kurla carshed EMU ready to serve people