esakal | रिलायन्स रुग्णालयात मायट्राक्लिपची पहिलीच शस्त्रक्रिया यशस्वी | reliance hospital
sakal

बोलून बातमी शोधा

reliance hospital

रिलायन्स रुग्णालयात मायट्राक्लिपची पहिलीच शस्त्रक्रिया यशस्वी

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : हृदयातील मायट्रल व्हॉल्ववरील (Heart mitral valve) मायट्राक्लिपची पश्चिम भारतातील पहिलीच शस्त्रक्रिया (First surgery) नुकतीच सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात (reliance hospital) यशस्वीरित्या झाली. दोन रुग्णांवर ऑगस्ट महिन्यात ही शस्त्रक्रिया झाली व त्यानंतर दोन दिवसांतच त्यांना घरी पाठविण्यात आले. पश्चिम भारतात फक्त याच रुग्णालयात ही शस्त्रक्रिया होते.

हेही वाचा: राज्याच्या मंत्रिमंडळाचा होणार विस्तार अन्‌ खांदेपालट

हृदयातील मायट्रल व्हॉल्वच्या गळतीवर उपचार असलेली मायट्राक्लिप ही रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त अशी उपचारपद्धती आहे. या पद्धतीत ओपन हार्ट सर्जरीची आवश्यकता नसते तर मायट्रल व्हॉल्वच्या दोन भागातून होणाऱ्या गळतीवर क्लिपिंग केले जाते. हार्ट ब्लॉकेज, हृदयाच्या कप्प्यांतील आकुंचित मार्ग ताणण्यासाठी केलेली शस्त्रक्रिया (डायलेटेशन ऑफ हार्ट चेंबर), व्हॉल्व लिफलेट प्रोलॅप अशाप्रकारची विविध कारणे हृदयातील मायट्रल व्हॉल्वमधील गळतीला जबाबदार असतात. आता यासाठी ही नवी उपचारपद्धती आली असून त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत, असे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

या शस्त्रक्रियेसाठी लागणारे उपकरण पाश्चात्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येते. मागील वर्षी ते भारतातही दाखल झाले असून सध्या सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात उपलब्ध आहे. या प्रक्रियेचे मुख्य लाभ म्हणजे त्यात व्हॉल्व ची कार्यक्षमता वाढते, हृदयाचा आकार नियंत्रित राहतो, श्वसनात अडथळे येण्याचे प्रमाण कमी होते व रुग्ण चांगले आयुष्य जगू शकतो, असे रुग्णालयाचे सीईओ तरंग ज्ञानचंदानी म्हणाले.

श्री. सुधीर मेहता 78 व श्री. रमेश राडिया (80) यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली व आता त्यांची प्रकृती उत्तम आहे. मायट्राक्लिप थेरेपी चा लाभ वयस्कर आणि गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांना होतो, असे सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशनमधील सल्लागार, कार्डीओलॉजिस्ट डॉ. मौलिक पारेख म्हणाले. तर मायट्रल व्हॉल्व्ह गळतीने त्रस्त असलेल्या रुग्णांना श्वासाचा त्रास असल्याने वारंवार रुग्णालयात आणावे लागते. या रुग्णांना आता ओपनहार्ट सर्जरीची गरज नाही, असे सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलचे सल्लागार कार्डीओलॉजिस्ट डॉ. निहार मेहता म्हणाले. ही शस्त्रक्रिया करणाऱ्या पथकात डॉ. निहार मेहता, डॉ. मौलिक पारेख, डॉ. ए. बी. मेहता, डॉ. एस. आर. हांडा, भूलतज्ज्ञ डॉ. हार्वेसप पँथकी आणि भूलतज्ज्ञ डॉ. क्रितिका शर्मा यांचा समावेश होता.

loading image
go to top