खेळता खेळता घाटकोपरच्या नाल्यात पडला ३ वर्षांचा चिमुरडा आणि...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

घाटकोपर येथील लक्ष्मिबाग नाल्यात आज दुपारी सवा बारा वाजल्याच्या सुमारास तीन वर्षांचा मुलगा बुडाला आहे.संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या मुलाचा शोध लागलेला नसून महापालिकेने मदतीसाठी नाविक दलाला बोलावले आहे.

मुंबई : घाटकोपर येथील लक्ष्मिबाग नाल्यात आज दुपारी सवा बारा वाजल्याच्या सुमारास तीन वर्षांचा मुलगा बुडाला आहे.संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या मुलाचा शोध लागलेला नसून महापालिकेने मदतीसाठी नाविक दलाला बोलावले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सुमारे तासाभराने अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. 

घाटकोपर पुर्व येथील सावित्रीबाई फुले नगर मधिल हुसेन शेख हा 3 वर्षाचा मुलगा दुपारी सवा बारा वाजल्याच्या सुमारास नाल्यात पडला. सुरवातीला स्थानिक कामगारांनी नाल्यात शोध घेतला. त्यानंतर दिड वाजल्याच्या सुमारास अग्निशमन दलाचे फ्लड रेस्क्यू टिम दाखल झाली. मात्र, या मुलाचा संध्याकाळ पर्यंत शोध लागला नव्हता.

मोठी बातमी - माझ्या खांद्यावरून, पवारांना वांद्रेच्या सिनिअर आणि बारामतीच्या ज्युनिअरवर बंदूक चालवायची...

महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षाकडून नाविक दलाचे डायव्हर्स तसेच राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण दलाला मदत पाठविण्याची विनंती केली आहे.

अग्निशमन दलाला या घटनेची माहिती 12:17 वाजता मिळाली. त्यानंतर 1:23 वाजता पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान याप्रकरणी अजूनही शोधकार्य सुरु आहे. 

heart wrenching news from ghatkopar 3 years kid fell into huge nala


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heart wrenching news from ghatkopar 3 years kid fell into huge nala