माझ्या खांद्यावरून, पवारांना वांद्रेच्या सिनिअर आणि बारामतीच्या ज्युनिअरवर बंदूक चालवायची...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

नुकत्याच आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे नेते कोकणाचा दौरा करतायत. सर्वात आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार आणि आता महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकणाचा दोन दिवसांचा दौरा करतायत.

मुंबई - नुकत्याच आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे नेते कोकणाचा दौरा करतायत. सर्वात आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार आणि आता महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकणाचा दोन दिवसांचा दौरा करतायत. देवेंद्र फडणवीस आजपासून दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत.

या दौऱ्याच्या सुरवातीला फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधलाय. “मी बारामतीसारख्या दुष्काळी भागातून येतो. देवेंद्र फडणवीस विदर्भातून येतात. समुद्राशी काहीही संबंध नाही. त्यामुळे फडणवीस येत आहेत तर चांगलं आहे. प्रत्येकाला ही परिस्थिती समजेल, ज्ञानात भर पडेल.” असा टोला शरद पवार यांनी लगावला होता. 

BIG NEWS - मुंबईत पुन्हा लागणार कडक लॉकडाऊन ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत...

दरम्यान यावर प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणालेत, शरद पवार यांचं वक्तव्य मी ऐकलं. मी  विदर्भाचा आहे आणि मी समुद्राची पाहणी करायला चाललोय असं ते म्हणालेत. मी अनेकदा बारामतीला देखील गेलोय, मात्र तिथे मला समुद्र  दिसला नाही.  माझे वडील आज असते तर तेही शरद पवारांच्या वयाचे असते. शरद पवार हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. त्यामुळे मुलगा कितीही पुढे गेला तरीही वडिलांना वाटतं की त्याला किती समजतं. त्या भावनेतून शरद पवार बोलले असतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. 

यापुढे बोलताना त्यांनी शरद पवारांना टोला देखील हाणाला, फडणवीस म्हणालेत, माझ्या खांद्यावरुन शरद पवार यांना वांद्र्याच्या सीनियर आणि बारामतीच्या ज्युनियरवर बंदूक चालवायची आहे आणि त्यांना काहीतरी करा असं सांगायचं आहे.

opposition leader devendra fadanavis targets NCP chief sharad pawar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: opposition leader devendra fadanavis targets NCP chief sharad pawar