esakal | नोव्हेंबरमध्ये हिट आणि कोल्डशॉक, तर डिसेंबरमध्ये मुंबई गोठणार
sakal

बोलून बातमी शोधा

नोव्हेंबरमध्ये हिट आणि कोल्डशॉक, तर डिसेंबरमध्ये मुंबई गोठणार

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबईत थंडीचा कडाका सुरु होणार असून डिसेंबरच्या मध्यापर्यंत रेकॉर्ड ब्रेक थंडी पडण्याची शक्यता आहे

नोव्हेंबरमध्ये हिट आणि कोल्डशॉक, तर डिसेंबरमध्ये मुंबई गोठणार

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई, ता. 11 : नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबईत थंडीचा कडाका सुरु होणार असून डिसेंबरच्या मध्यापर्यंत रेकॉर्ड ब्रेक थंडी पडण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर मुंबईत हाडं गोठवणाऱ्या थंडीला सुरवात होणार असून दिवसाचे तापमान 15 अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. पाऊस जास्त झालेला असल्याने जमिनीत पाण्याचा अंश जास्त असल्याने थंडी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील काही दिवस मुंबईत दिवसा हिट आणि रात्री कोल्डशॉक अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे. 

हवामान संशोधक प्रा. किरणकुमार जोहरे यांनी ही शक्यता मांडली आहे. सध्या उत्तरेतून थंड वारे वाहत असून त्यामुळे रात्रीच्या वेळी गारवा जाणवत आहे. मात्र, हळूहळू वाऱ्यांचा वेग कमी होऊन दिवसा उकाडा जाणवेल. दिवसा आणि रात्रीच्या तापमान 10 अंशाची तफावत राहाणार असल्याने नोव्हेंबरमध्ये दिवसा हिट आणि रात्री कोल्डशॉक जाणवणार आहे.

महत्त्वाची बातमी : अन्वय नाईक आणि रश्मी ठाकरेंमध्ये जमीन व्यवहार; ठाकरे वैयक्तिक कारणामुळे अर्णब यांना टार्गेट करतायत ? - किरीट सोमय्या

त्यामुळे मानवी तसेच प्राण्याच्या आरोग्यावरीही परीणाम होण्याची शक्यता प्रा. किरणकुमार जोहरे व्यक्त करतात. हवेतील आर्द्रता कमी होऊ लागल्याने नोव्हेंबर महिन्यात उकाडा जाण्याचे एक कारण आहे. गेल्या वर्षी थंडी 15 नाेव्हेंबरनंतर सुरु झाली होती. तर,यंदा 15 डिसेंबर नंतर थंडी सुरु राहाणार आहे. यंदा मुंबईत विक्रमी थंडी पडण्याची शक्यता असून दिवसाचे तापमानही 15 अंशापर्यंत येण्याची शक्यता आहे  असे अंदाजही प्रा. जोहरे यांनी व्यक्त केला.

आरोग्याची काळजी घेण्याची गरज : यंदा मान्सून लांबला होता. त्यामुळे मान्सूनचा बदलला पॅटर्न आणि त्याचबरोबर वादळाचा बदललेला पॅटर्न यामुळे सध्या दिवसा उकाडा जाणवत आहे. तर, संध्याकाळपासून गारवा जाणवू लागतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याची गरज असल्याचेही प्रा. जोहरे यांनी नमुद केले. खासकरुन रक्तदाब, हृदयविकार तसेच श्‍वसनाचे आजार असलेल्या रुग्णांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आवश्‍यकतेनुसार डॉक्टरचा सल्ला घ्यावा असेही त्यांनी नमुद केले.

महत्त्वाची बातमी : मृतक एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाखांची मदत; एसटी कामगार सेनेची कुटुंबियांना भावनिक साद

20 डिसेंबर ते 20 मार्च थंडी : प्रा. जोहरे हे इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रीओलॉजीचे माजी शास्त्रज्ञ असून यंदा 20 डिसेंबर ते 20 मार्च हा थंडीचा काळ राहाणार आहे. 21 डिसेंबर पासून सुर्याचे उत्तरायण सुरु होणार आहे. त्यामुळे दिवस लहान होणार असल्याने पृथ्वीवर येणारी सुर्यांची उष्णता कमी होणार आहे. त्याचा परीणाम तापमानावर होणार असल्याने यंदा विक्रमी थंडी पडण्याची शक्यता आहे.  

( संपादन - सुमित बागुल )

heat shock during day and cold wave during night this winter mumbai will freeze

loading image