

Maharashtra Assembly Witnesses Political Showdown During Heavy Rain Discussion
sakal
मुंबई : भास्कर जाधव यांनी राज्यात झालेल्या अतिवृष्टीचा मुद्दा अल्पकालीन चर्चेत उपस्थित केला. पावसाने अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या पण त्या दूर करण्यासाठी आपली यंत्रणा सक्षम नाही. नैसर्गिक संकटाची पूर्वकल्पना मिळाली होती, तर राज्यकर्ते म्हणून आपण काय केले? केवळ संकट येणार असे सांगून सरकारची जबाबदारी संपली का? असे सवाल जाधव यांनी उपस्थित केले. यावेळी आमदार आदित्य ठाकरे, भास्कर जाधव आणि भाजपचे आमदार अतुल भातखळकर एकमेकांना भिडले.