

Heavy rain and hailstorm
ESakal
बदलापूर : ठाण्याजवळील काही शहरांमध्ये तसेच नवी मुंबई, रायगड, अलिबाग या ठिकाणी आज पावसाने हजेरी लावली. काही भागांत मुसळधार पाऊस तर बदलापूर, अलिबाग परिसरात गारा पडल्याच्या घटना घडल्या. पहाटेपासून विविध ठिकाणी सुरू असलेल्या पावसाने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली.