
Mokhada Rain
Sakal
मोखाडा : मोखाड्यात 26 ते 28 सप्टेंबर या तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने, तालुक्यातील 54 गावातील 154 हेक्टर भात क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा सुमारे 1 हजार 29 शेतकर्याना फटका बसला आहे. कृषी विभागाने, नुकसान ग्रस्त भागाची प्राथमिक पाहणी केल्यानंतर नुकसानीचा अहवाल जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाला सादर केला आहे.