
मुंबई : काल रात्रीपासून पावसाचा वाढलेला जोर आज दिवसभर कायम राहिल्याचे दिसून आले. पावसाने दिवसभर मुंबईला चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे बऱ्याच परिसरातील सखल भागात पाणी तुंबले असून रस्ते वाहतुकीला फटका बसला आहे. तसेच रेल्वे सेवाही विलंबाने सुरू होती. यामुळे सकाळी कामावर जाताना आणि आता कामावरून घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत.