
नवी मुंबई : नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे वाशीतील एपीएमसी मार्केटच्या पाचही बाजार जलमय झाले होते. दुपारी पावसाचा जोर ओसरल्यानंतरही मार्केटमध्ये पाणी ओसरले नव्हते. त्यामुळे बाजारात घाणीचे साम्राज्य पसरल्याने दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागला. तर रेल्वे मार्गासह रस्त्यांवरील भूयारी मार्ग पाण्याखाली गेल्याने अनेकांना कसरत करावी लागली.