Mumbai Rains : पहिल्याच सोमवारी उडाली मुंबईची 'दाणादाण'

mumbai
mumbai

मुंबई : जुलै महिन्याच्या पहिल्याच सोमवारी मुसळधार पावसाने मुंबईची दैना झाली आहे. जागोजागी पाणी तुंबल्याने रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. त्यातच तिन्ही मार्गावरील रेल्वे सेवेवर परिणाम झाल्याने लोकांची तारांबळ उडाली. पावसामुळे शाळकरी मुलांची ही बरीच फरफट झाली.

कुठे पाणी साचले
सायन सर्कल, हिंदमाता, गांधीमार्केट, परळ, दादर टिटी, सेनापती बापट मार्ग, लालबाग, प्रतीक्षा नगर, संगम नगर, आगरवाडी टेलिकॉम फॅक्टरी, आरसीएफ, चिंता कॅम्प, नॅशनल कॉलेज,एसव्ही रोड

मुंबईत किती पाऊस झाला
शहर - ३३.९ मीमी

पूर्व उपनगर-१६.३८ मीमी

पश्चिम उपनगर-१६.९२ मीमी

१२ घरं कोसळली

मुसळधार पावसामुळे मुंबईत १२ घरं किंवा घराच्या भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.शहर ५ , पूर्व उपनगर ४ आणि पश्चिम उपनगर ३ घटनांची नोंद झाली आहे.

शॉक सर्किटमुळे एकाचा मृत्यू

पावसामुळे शॉकसर्किटच्या २१ घटना घडल्या असून शहर ८,पूर्व उपनगर ७ आणि पश्चिम उपनगर ६ घटनांची नोंद झाली आहे.यात गोवंडीतील मोहम्मद काझी या व्यक्तीचा घरात शॉक लागून मृत्यू झाला आहे.

रेल्वे सेवेला फटका

सकाळी मारिन लाईन्स स्टेशन परिसरात बनधकाम सुरू असलेल्या ठिकाणचे काही बांबू जोरदार हवेमुळे ओव्हर हेड वायरवर पडल्यामुळे पश्चिम रेल्वे काही काळ खोळंबली होती.मध्य रेल्वे मार्गावर सायन आणि कुर्ला रेल्वे स्थानकावर पाणी साचल्याने या मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली होती तसेच जलद लोकल संथ गतीने सुरू होती तर हार्बर सेवा रेल्वे रुळावर पाणी साचल्याने साधारणता २० मिनिटे उशिराने धावत होती.

बेस्ट मार्ग ही वळवले

रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतूक कोंडी झाल्याने बेस्टचे मार्ग पर्यायी मार्गाने वळवण्यात आले होते.

सायन रोड ना २४ वरून सायन रोड न ३ वर

हिंदमाता सिनेमा वरून हिंदमाता पुलावरून

गांधी मार्केट,किंगस सर्कल वरून भाऊ दाजी रोड

समाज मंदिर हॉल,प्रतीक्षा नगर वरून जयशंकर यगणिक मार्ग

सुंदर विहार,प्रतीक्षा नगर वरून कोकरी आगार

संगम नगर वरून वाल्मिकी चौक

नॅशनल कॉलेज,एस व्ही रोड वरून पी डी हिंदुजा पुल

आरसीएफ कॉलनी वरून वाशी नाका

चिंता कॅम्प,मंडाला वरून अणुशक्ती नगर

५६ ठिकाणी झाडे व फांद्या कोसळल्या

शहरात ५६ ठिकाणी झाडे व फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या असून शहर २६,पूर्व उपनगर ६ आणि पश्चिम उपनगर २४ घटनांची नोंद झाली आहे.

पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरांतील काही भागात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता कुलाबा वेध शाळेने वर्तवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com