मुंबईत पुन्हा दमदार पावसाची एन्ट्री, अनेक ठिकाणी पाणीच पाणी

पूजा विचारे
Monday, 27 July 2020

मुंबईसह पश्चिम उपनगरांमध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुंबईतील दादर, परळ, सायन, घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, गोरेगाव, मालाड या भागांत पाणीच पााणी झालं आहे.

मुंबईः मुंबईसह पश्चिम उपनगरांमध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुंबईतील दादर, परळ, सायन, घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, गोरेगाव, मालाड या भागांत पाणीच पााणी झालं आहे. रविवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे.  दादर, परळ, सायन, घाटकोपर, कुर्ला या भागांमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. सोमवारी पहाटेपासून उपनगरातील विविध भागांमध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत. पहाटेपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे. 

पहाटेपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे हिंदमाता, अंधेरी, कुर्ला, सायन यासह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. गेल्या आठवड्यात दडी मारलेल्या पावसानं पुन्हा एकदा दमदार एन्ट्री मारली आहे. मुंबईत येत्या काही तासात आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अधिक वाचाः  मुंबईत भाजपच्या नव्या कार्यकारिणीची पहिल्या बैठकीस सुरुवात

पाणी साचल्यामुळे काही भागात वाहतूक देखील ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळच्या वेळी अनेकजण कामासाठी घराबाहेर पडले आहेत. त्यातच कोसळणाऱ्या पावसामुळे चाकरमान्यांच्या अडचणीत वाढ झालीय. पाणी साचल्यामुळे हिंदमाता उड्डाणपुलाखालचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पाणी कमी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत असून मॅनहोल्सही उघडे करण्यात आले असून पाण्याचा निचरा करण्यात येतोय.

हेही वाचाः  क्या बात! कोरोना टेस्टसाठी मुंबईत सुरु होणार हायटेक लॅब

हवामान विभागानं मुंबईसह उपनगरात पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. प्रामुख्यानं कोकण आणि विदर्भामध्ये पुढील तीन-चार दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

heavy rain mumbai increased early morning today waterlogging reported


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain mumbai increased early morning today waterlogging reported