क्या बात! कोरोना टेस्टसाठी मुंबईत सुरु होणार हायटेक लॅब

क्या बात! कोरोना टेस्टसाठी मुंबईत सुरु होणार हायटेक लॅब

मुंबईः कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्रासह मुंबईतही कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. त्यातच मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी उच्च क्षमता असलेल्या कोविड-19 लॅबचं उद्घाटन करणार आहेत. मुंबई, कोलकाता आणि नोएडा अशा तीन ठिकाणी या लॅब सुरु होणारेत. यामुळे  कोरोनाची चाचणी करण्यासाठी मुंबईत आणखी एक अत्याधुनिक लॅब सुरु होईल. व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे हा कार्यक्रम होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणारेत.

देशात अशा प्रकारच्या तीन अत्याधुनिक लॅब सुरु होत असून त्यामुळे एकाच दिवसात तब्बल 10 हजार रुग्णांच्या चाचण्या करणं शक्य होणारेय.ICMRच्या मदतीने या लॅब्स सुरु होणारेत.

पंतप्रधान कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील उपस्थित राहणारेत. 

मुंबईत आता रोजच्या १२ हजार चाचण्या 

ज्या भागात कोरोनाचा प्रार्दुभाव जास्त आहे अशा भागात कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे, पहिल्या टप्प्यात दररोज १२ हजार चाचण्या करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या वरिष्ठ अधिकारी आणि मुंबई कृती दलाच्या डॉक्टरांच्या बैठकीत मुंबईतील कोरोना चाचण्यांचा वेग वाढविण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी मुंबईत खासगी आणि शासकीय प्रयोगशाळा मिळून रोज साडेचार हजार चाचण्या होत होत्या.  या चाचण्यांचा वेग वाढविण्यासाठी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याची माहिती मिळतेय.

मुंबई कोरोनाचा प्रार्दुभाव जास्त असलेल्या विभागात यानंतर कोरोना चाचणी करण्यासाठी किऑक्स उभारण्यात येतील. या ठिकाणी केवळ स्वॅब घेतले जाणार असून हे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचं आयुक्त चहल यांनी स्पष्ट केलं आहे.

pm modi launch high throughput COVID-19 testing facilities lab mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com