esakal | मुंबईत श्रावणसरी बरसणार; ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता...
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत श्रावणसरी बरसणार; ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता...

दरम्यान, येत्या 24 तासांत मुंबई आणि उपनगरात एखाद-दोन हलक्या पावसाच्या सरी बरसतील, अशीही शक्यता वर्तवली आहे.

मुंबईत श्रावणसरी बरसणार; ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता...

sakal_logo
By
संजय घारपुरे

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई तसेच उपनगरात पावसाने ब्रेक घेतला आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सलग तीन दिवस जोरदार पाऊस झाल्यानंतर वरुणराजा केवळ हजेरी लावण्यापुरता येत आहे. मात्र, मुंबईकरांना आता श्रावणसरींचा आनंद लुटता येणार असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. स्कायमेट या खासगी वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे. 

Mumbai should look out for sustained rain from August 3rd to 10. #MumbaiRains @MumbaiLiveNews @MumbaiRainApp @SkymetWeather pic.twitter.com/NcZLOM8b65

— Jatin Singh (@JATINSKYMET) July 26, 2020

दरम्यान, येत्या 24 तासांत मुंबई आणि उपनगरात एखाद-दोन हलक्या पावसाच्या सरी बरसतील, अशीही शक्यता वर्तवली आहे. मुंबई वेधशाळेनुसार, सांताक्रुझमध्ये 9 मिलिमीटर आणि कुलाबा येथे 24 मिलिमीटर पाऊस झाला आहे. सध्याच्या वातावरणात आगामी चार दिवसात फारसा बदल अपेक्षित नाही. पावसाचा जोरही वाढणार नाही असे स्कायमेटने सांगितले आहे. 

सोशल मीडियावरील ट्रोलिंगविरोधात सोनाक्षीने उचलले 'हे' पाऊल...

कर्नाटकच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात वादळी स्थिती निर्माण होत आहे. यामुळे कोकण आणि गोव्यात पाऊस होत आहे. त्यामुळे मुंबई आणि परिसरात पुढील आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. स्कायमेट प्रत्येक दिवशी हवामानाबाबत  अंदाज व्यक्त करीत असते. त्यानुसार 31 जुलैपासून मुंबईतील पावसाचा जोर वाढेल. मुंबईत 3 आणि 4 ऑगस्टला जोरदार पाऊस अपेक्षित आहे. ऑगस्टच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर वाढेल आणि त्यामुळे वातावरण जास्त आल्हाददायक होण्याची शक्यता आहे. मुंबई वेधशाळेने मात्र रविवारी रात्री मुंबई तसेच परिसरात काही ठिकाणी पावसाच्या काही जोरदार सरी अपेक्षित आहेत असे ट्वीट केले आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे

loading image
go to top