सोशल मीडियावरील ट्रोलिंगविरोधात सोनाक्षीने उचलले 'हे' पाऊल...

सोशल मीडियावरील ट्रोलिंगविरोधात सोनाक्षीने उचलले 'हे' पाऊल...

मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडिया बराच लोकप्रिय झाला आहे. सोशल मीडियाचं उद्दिष्ट म्हणजे लोकांना व्हर्चुअल पद्धतीने एकमेकांच्या जवळ आणणे. पण त्याचे जेवढे फायदे आहेत तितकेच तोटेही आहेत. सोशल मीडियावर ट्रोलिंग आणि सायबर गुंडगिरीची प्रकरणे दिवसेंदिवस चिंताजनक बनली आहेत. सोशल मीडिया ट्रोलिंग आणि गुंडगिरी हे लोकांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होण्याचे एक प्रमुख कारण बनले आहे. कलाकारांप्रमाणेच सामान्य नागरिकांना देखील याचा वरचेवर सामना करावा लागतोय.

अशाचप्रकारे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानेही आतापर्यंत बरीच वर्ष ट्रोल्स आणि गुंडगिरीचा सामना केला आहे. आता तिने ऑनलाईन गुंडगिरी संपवण्यासाठी आता मिशन जोश आणि इतर काही सायबर तज्ज्ञांशी एकत्र येऊन 'फुल स्टॉप टू सायबर गुंडगिरी' ही मोहीम सुरू केली आहे.

मुंबईत लोकल सेवा सुरु होणार?, पालिका आयुक्तांनी घातली 'ही' अट

या मोहिमेचे नेतृत्व सोनाक्षी व महाराष्ट्राचे विशेष आयजीपी डॉ. प्रताप दिघावकर करणार आहेत. तसंच पॅनेलच्या पाच वेगवेगळ्या सदस्यांशी थेट संवादांचे आयोजन करून ते सोनाक्षीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दाखवले जाणार आहे. ट्रोलिंग आणि गुंडगिरी या विषयांवर लोकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण करणे आणि सायबर गुन्ह्यांच्या विविध महत्वाच्या बाबींचे लक्ष देऊन ट्रोलर्स, त्रास देणारे, गुंडगिरी करणाऱ्यांना असे केल्याने काय कायदेशीर कारवाई होऊ शकते याची जाणीव करून देणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या मोहिमेअंतर्गत पहिला संवाद 26 जुलै रोजी प्रसारित होईल.

याबद्दल अधिक बोलताना सोनाक्षी म्हणाली, "सोशल मीडिया हे सकारात्मकतेच्या उद्देशाने तयार केले गेले होते. दुर्दैवाने, सायबर गुंडगिरी आणि मानसिक छळ वाढल्याने ते एक विषारी स्थान बनले आहे. मी स्वतः ट्रॉल्स आणि सायबर बुलिंगला बळी पडले आहे. मिशन जोश या आमच्या मोहिमेचे उद्दीष्ट सायबर धमकी, ऑनलाइन ट्रोलिंग, सायबर कायदे आणि मानसिक छळ याबद्दल जागरूकता पसरवणे हे आहे. पोलिस अधिकारी डॉ. प्रताप दिघावकर आणि मी तज्ञांशी बोलून यासंदर्भातील बर्‍याच मुद्द्यांविषयी जास्तीत जास्त महिती लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत."
----
संपादन ः ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com