महाडमध्ये आजही मुसळधार पावसामुळे पुराची भीती कायम, दरड कोसळल्याने घरांचं नुकसान

सुनील पाटकर
Thursday, 6 August 2020

नडगाव येथे पाच घरांचे नुकसान, कोतुर्डेत दोन गुरे दरडीखाली

महाड : महाड शहरातील नद्यांची धोक्याची पातळी कमी झाली असली, तरी पावसाचा जोर अजूनही कायम आहे. दोन दिवसांच्या या मुसळधार पावसात नडगाव काळभैरवनगर येथे दरड कोसळल्याने पाच घरांचे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. तर कोतुर्ड भणगेवाडी येथे दरड कोसळून दोन गुरे गाडली गेली आहेत.

महाड शहर आणि तालुक्यात पावसाने दोन दिवसांपासून कहर केला आहे. सावित्री, काळ व गांधारी नद्यांना पूर आल्याने महाड शहरातील सखल भागात साडेपाच फूट पाणी साचले होते. कोथेरी गावातील सात वाड्यांकडे जाणारा रस्ता तर पाण्याने वाहून गेला आहे. वाहतूक आणि दूरध्वनी सेवा बंद पडली होती. गुरुवारी पहाटे पुराचे पाणी ओसरले असले, तरी पावसाचा जोर व मोठी भरती यामुळे महाडकर चिंतेत आहेत.

महत्त्वाची बातमी - मुंबईत पुन्हा महाभयंकर पाऊस होऊ शकतो, 'ही' आहे तारीख....

नडगाव, बिरवाडी काळभैरवनगर येथे दरड कोसळल्याने पाच घरांचे नुकसान झाले आहे. तर कोतुर्डे भणगेवाडीतही दरड कोसळल्याने बबन बाबू बावदाणे यांचा बैल व अनिल सखाराम गोरे यांची म्हैस दरडीखाली सापडली आहे. या ठिकाणचे पंचनामे केल्याची माहिती नायब तहसीलदार प्रदीप कुडळ यांनी दिली.

( संकलन - सुमित बागुल )

heavy rainfall in mahad might lead to massive floods landslide causes damage as well 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rainfall in mahad might lead to massive floods landslide causes damage as well