मुंबईत पुन्हा महाभयंकर पाऊस होऊ शकतो, 'ही' आहे तारीख....

सुमित बागुल
Thursday, 6 August 2020

मुंबईत पुन्हा असाच भयंकर पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय.

मुंबई : मुंबईत या आठवड्याच्या सुरवातीला म्हणजेच सोमवारी पावसाची संततधार सुरु झाली. मंगळवारी आणि बुधवारी मुंबईत धुवाधार पाऊस बरसला. मुंबईत बरसणाऱ्या पावसाने गेल्या अनेक वर्षांचे रेकॉर्डही मोडलेत. मुबंईत ज्या भागात पाणी साठत नाही त्या भागातही कालच्या पावसामध्ये पाणी साठलेलं पाहायला मिळालं. कोरोनाच्या संवेदनशील काळात अनेक घरांसोबतच मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं. गेल्या अनेक वर्षात मुंबईत असा पाऊस पहिला नाही असं अनेकांनी म्हंटलं. मुंबईतील पावसाचं हे भीषण रौद्र रूप पाहून मुंबईकरांची चिंता चांगलीच वाढली होती.

मोठी बातमी - रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन आणि म्हणालेत...

दरम्यान, मुंबईत पुन्हा असाच भयंकर पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबई पाऊस केंद्रीय हवामान खात्याचे संशोधक डॉक्टर जेनमानी यांनी याबाबत माहिती दिली आहे. काल आणि  परवा ज्याप्रकारे वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळला, तसा मुसळधार पाऊस येत्या ११ तारखेला म्हणजे येत्या मंगळवारी होणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवलाय. 

मोठी बातमी - 5 ऑगस्टपासून सुरू झालेले मॉल 6 ऑगस्टपासून बंद, महापालिका आयुक्तांचा निर्णय

आजही मुसळधार पावसाचा इशारा : 

आज सकाळपासून मुंबईतील पावसाने जरा उसंत घेतली आहे. पण आजही मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड परिसरात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असंही सांगण्यात आलंय. हवामान विभागाने आजच्या पावसासाठी  रेड अलर्ट जारी केलाय. 

weather department scientist predicts massive rainfall in mumbai on 11th august 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: weather department scientist predicts massive rainfall in mumbai on 11th august