Bhiwandi Road PotholesESakal
मुंबई
Thane News: मुसळधार पावसाने रस्त्यांची चाळण! प्रशासनाच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर नागरिकांचा प्रश्न
Road Potholes: भिवंडी महापालिका क्षेत्रात डांबरी रस्त्यावर मागील महिन्यापासून झालेल्या पावसामुळे मोठ्या संख्येने खड्डे झाले आहेत. यामुळे प्रशासनाच्या अशा व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
भिवंडी : भिवंडी महापालिका क्षेत्रात डांबरी रस्त्यावर मागील महिन्यापासून झालेल्या पावसामुळे मोठ्या संख्येने खड्डे झाले आहेत. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. डांबरी रस्ता बनविण्यासाठी पालिका प्रशासन खर्च करते आणि नंतर रस्त्यात खड्डे झाल्यावर ते भरण्यासाठी देखील नागरिकांचा पैसे खर्च करते. प्रशासनाच्या अशा व्यवहाराची नागरिकांनी चौकशी करण्याची मागणी वाढू लागली आहे.