मुंबईत आज जोरदार पावसाची शक्यता; तर ऑगस्टमध्ये सरासरी 'इतक्या' पावसाची नोंद

समीर सुर्वे
Monday, 31 August 2020

मुंबईमध्ये ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या 60 टक्के पाऊस झाला आहे. रविवारीही पावसाची संतत धार सुरु होती. तर, सोमवारी अधून मधून ताशी 45 ते 55 किलोमीटर वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी बरसण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

मुंबई: मुंबईमध्ये ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या 60 टक्के पाऊस झाला आहे. रविवारीही पावसाची संतत धार सुरु होती. तर, सोमवारी अधून मधून ताशी 45 ते 55 किलोमीटर वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी बरसण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

50 लाखांची खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्यांचा पोलिसांनी 'असा' उधळला कट

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर वाढला होता. 30 ऑगस्टपर्यंत सांताक्रुझ येथे 3091 मिमी तर, कुलाबा येथे 2853.3 मिमी पाऊस झाला आहे. ऑगस्टपर्यंत होणाऱ्या पावसाच्या सरीसरीपेक्षा हा तब्बल 60 टक्के जास्त पाऊस आहे. मुंबई वेधशाळेचे उपमहासंचालक के.एस होसाळकर यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. कुलाबा येथे आज सकाळी 8.30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत 18.4 मिमी आणि सांताक्रुझ येथे 12 तासात 26.4 मिमी पाऊस नोंदविण्यात आला आहे. 

मुंबईत गेल्या 24 तासात 1237 कोरोनाबाधितांची भर; वाचा इतर सविस्तर आकडेवारी

पावसाची संतत धार सुरु असल्याने हवेतही गारावा असून कुलाबा येथे 27.8 अंश कमाल आणि 24.5 अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर, सांताक्रुझ येथे कमाल 27.7 आणि 23.8 कमाल तापमानाची नोंद झाली आहे. सोमवारी पावसाची संततधार सुरू राहाण्याची शक्यता आहे. अधून मधून ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains expected in Mumbai today; 60 percent rain in August