मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज; ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातही जोर वाढणार

समीर सुर्वे
Wednesday, 2 September 2020

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्गाच उद्या पासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे

मुंबई : रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्गाच उद्या पासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. शुक्रवारी या तीन जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे.तर, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात 6 सप्टेंबर पर्यंत हलक्‍या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. मुंबईत आज पासून दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा जाणावू लागल्या आहेत.

चुकीला...माफी नाही! आर्थिक दंडासह दुकान बंद तर नागरिकांवरही एफआयआर दाखल होणार

सांताक्रुझ येथे आज दिवसभरात कमाल तापमानात 2 अंशाची वाढ नोंदविण्यात आली आहे. बुधवारी सकाळी 8.30 वाजे पर्यंत संपलेल्या 24 तासात कुलाबा येथे कमाल 30 अंश आणि किमान 25.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर, आज संध्याकाळ पर्यंत कमाल 32 आणि किमान 24.8 अंशाची वाढ नोंदवली आहे. कुलाबा येथेही कमाल तपामानात आज दिवसात 1 अंशांची वाढ नोंदविण्यात आले आहे. कुलाबा येथे आज संध्याकाळ पर्यंत कमाल 31.5 आणि 25.8 अंश सेल्सिअस तपामानाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवस तापमान याच पातळीवर राहाणार आहे. तर, मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात 6 सप्टेंबर पर्यंत पावसाच्या हलक्‍या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

मोठी बातमी! दहावी बारावी फेरपरीक्षा यंदा लांबणीवर; जाणून घ्या कोणत्या महिण्यात होणार परीक्षा

कोकणात रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे.शुक्रवारी रायगड, रत्नागिरीसह सिंधदुर्ग जिल्ह्यात मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे.तर,रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात 6 सप्टेंबर पर्यंत पावसाचा जोर राहाणार आहे.

----------------------------------------------------------

 (संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains forecast in Mumbai again; Alert to Thane, Palghar, Raigad districts also